• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

होमिओपॅथीला राजाश्रयाची गरज …. जगातील पहिल्या होमिओपॅथिक हॉस्पिटलचे जनक प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉ. अमरसिंह निकम

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
December 28, 2023
in आपला जिल्हा
0
होमिओपॅथीला राजाश्रयाची गरज …. जगातील पहिल्या होमिओपॅथिक हॉस्पिटलचे जनक प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉ. अमरसिंह निकम
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

होमिओपॅथीला राजाश्रयाची गरज …. जगातील पहिल्या होमिओपॅथिक हॉस्पिटलचे जनक प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉ. अमरसिंह निकम

…पुणे..

दि. 27 रोजी कोथरुड पुणे येथे पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना व ऍडवेन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने मेगा होमिओकॉन 2023 चे आयोजन करण्यात आले होते .

उद्घाघाटक जगातील पहिल्या होमिओपॅथिक हॉस्पिटलचे जनक प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉ. अमरसिंह निकम यांनी होमिओपॅथी ही लोकाश्रेयावर टिकून असून तिला राजाश्रयाची गरज असल्याचे सांगितले. होमिओपॅथिक औषधाने अतिदुर्धर आजार सुद्धा सहजरीत्या बरे होऊ शकतात त्यासाठी सखोल अभ्यासाची गरज असून मेगा होमिओकॉन सारख्या चर्चासत्रातून नव नवीन संशोधने व ज्येष्ठांचे अनुभव सर्वांसमोर येतात व होमिओपॅथि शास्त्र सोप्या पद्धतीने नवीन लोकांना समजण्यासाठी फायदा होतो,त्यामुळे मेगाहोमिओकॉन सारख्या कार्यक्रमांची गरज असल्याचे सांगत, बारा वर्षांपासून सातत्याने मेगाहोमिओकॉनचे आयोजन होत असल्याबद्दल त्यांनी गौरवोदगार काढले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेचे प्रशासक डॉ. विलास हरपाळे यांनी महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेच्या माध्यमातून होमिओपॅथिक डॉक्टरांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत परिषदेचे कामकाज अति जलद होण्यासाठी पावले उचललेली आहेत असे सांगितले.

प्रास्ताविकात पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय तायडे यांनी होमिओपॅथीचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने मेगाहोमीओकॉन 2023 चे आयोजन करण्यात आल्याचे सांगत आज पर्यंत संघटनेने मोफत होमिओपॅथिक औषधोपचार शिबिरांचे आयोजन, रक्तदान शिबिरांचे आयोजन, गोर ,गरीब व होतकरू रुग्णांना शासकीय मदत मिळावी यासाठी प्रयत्न,आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार करण्यात यावेत यासाठी चर्चासत्राचे आयोजन असे विविध उपक्रम संघटना सातत्याने राबवत असल्याचे सांगितले.

प्रमुख पाहुणे महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेचे मा.अध्यक्ष डॉ. अजित फुंदे पाटील यांनी होमिओपॅथीचे नेते डॉ. अरुण भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना होमिओपॅथिक चळवळीतील चढ-उतार यांची माहिती देऊन महाराष्ट्रातील पहिले शासकीय होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय ,महाराष्ट्रातील पहिले शासकिय आयुष हॉस्पिटलची उभारणी केली.

यापुढे होमिओपॅथीच्या विकासासाठी सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाळासाहेब हरपळे यांनी होमिओपॅथिक डॉक्टरांना केंद्र व राज्यस्तरावर जी काही मदत लागेल ती पक्षाच्या मार्फत देऊ असे सांगितले.

जगातील पहिले होमिओपॅथी पी.एच.डी.धारक डॉ. हरी घोलप यांनी मेगाहोमिओकॉन सारख्या कार्यक्रमामुळे नवोदित डॉक्टरांना नवनवीन संशोधने व अनुभवी डॉक्टरांचे अनुभव पहावयास मिळतात , त्यामुळे अशा कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करून आपल्या प्रॅक्टिस मध्ये काळानुरूप बदल करणे गरजेचे असल्याचे सांगत प्रत्येक होमिओपॅथी डॉक्टरांनी दररोज होमिओपॅथीचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे मा.उपाध्यक्ष डॉ.बाळकृष्ण गायकवाड यांनी महाराष्ट्रामधील होमिओपॅथिक डॉक्टरांना शासकीय नोकऱ्या नाहीत,त्याचबरोबर सीसीएमपीधारक उत्तीर्ण डॉक्टरांचे एम.एम.सी मधील रजिस्ट्रेशन प्रलंबित असून यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. होमिओपॅथीचे नेते डॉ.अरुण भस्मे यांनी 2014 साली नागपूर अधिवेशनामध्ये तेरा दिवस राज्य सरकारच्या विरोधात उपोषण करून आपल्या काही मागण्या मान्य करण्यास सरकारला भाग पाडले होते,त्याचप्रमाणे आता सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याची वेळ आली आहे असे सांगितले.

यावेळी धोंडुमामा साठे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या डॉ.मनीषा सोळंकी,लोकमान्य होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या डॉ.नंदिनी जोशी,महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मा.सिनेट सदस्य डॉ.अमित भस्मे,पुरंदर मेडिकल संघटनेच्या अध्यक्षा डॉ.वृषाली जगताप यांनीही शुभेच्छ्यापर आपली मनोगते व्यक्त केली.या चर्चासत्रात प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.सचिन नागापूरकर यांनी हाडांच्या विकारांमध्ये होमिओपॅथिक औषधे चांगल्या प्रकारे काम करतात हे अनुभवासह सांगितले.

प्रसिद्ध होमिओपॅथिक सेक्सॉलॉजिस्ट डॉ. अमित नाळे यांनी लैंगिक समस्या वर खुलेआमपणे चर्चा होण्याची गरज असल्याचे सांगत टीव्ही,वर्तमानपत्रातील जाहिरातीवर लोकांनी विश्वास न ठेवता योग्य होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घेतला तर लैंगिक समस्येपासून मुक्ती मिळू शकते असे सांगितले. प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉ.सचिन खिरीड यांनी होमिओपॅथिक औषधोपचार हे जुनाट आजाराबरोबरच नवीन झालेल्या आजारावर सुद्धा फायदेशीर ठरू शकतात हे उदाहरणासह सोप्या भाषेत समजावून सांगितले.

पिंपरी येथील प्रसिद्ध होमिओपॅथिक मानसोपचार तज्ञ डॉ.अनन्या चितळे यांनी मानसिक आजारावर होमिओपॅथी शिवाय पर्याय नसल्याचे सांगत शरीर,मन याचा विचार करणारे जगातील एकमेव शास्त्र हे होमिओपॅथी असल्याचे सांगितले.बारामतीचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉ.ज्ञानेश्वर पवार यांनी लहान मुलांच्या आजारामध्ये सहजरीत्या सोप्या पद्धतीने रुग्णांचे योग्य निरीक्षण केल्यास योग्य ती औषध निवड करता येते हे उदाहरणासह दाखवून दिले व होमिओपॅथी औषधे ही प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असतात असे सांगितले.

सासवडचे डॉ.दीपक जगताप यांनी सौंदर्य समस्या,त्वचा विकार यावर ऍडवेन कंपनीची औषधे चांगले काम करतात हे उदाहरणासह सांगितले.डॉ. श्रद्धा पेन्नावर यांनी होमिओपॅथिक औषधांचे संशोधन करून त्याचे पेटंट कसे करावे याविषयी माहिती दिली.

या चर्चासत्रासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर होमिओपॅथिक डॉक्टरांनी गर्दी केली होती.चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी आयोजन समितीच्या चेअरमन डॉ.मनीषा दणाने, सचिव डॉ.दयानंद पवार ,उपाध्यक्ष डॉ.किरण घाडगे ,खजिनदार डॉ.पल्लवी कदम,सदस्य डॉ.अपर्णा तायडे,डॉ.नयना सोनवणे,डॉ.राजेश बर्डे,डॉ.विश्वास बिनवडे,डॉ.नंदा गायकवाड,डॉ.एच.के.देशमुख,डॉ. सतीश जगदाळे,डॉ.संजय खेडेकर,डॉ.सचिन वायदंडे ,ऍडवेन बायोटेक प्रा.कंपनीचे सेल्स मॅनेजर प्रमोद इंगळे,अमर कुमटेकर इ.परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिशन आयुर्वेदाचे डॉ.मधु राव यांनी केले तर आभार पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेचे कोथरूड विभागाचे प्रमुख डॉ.राजकुमार अंबड यांनी मानले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
आश्विनी भापकर यांची काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

आश्विनी भापकर यांची काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In