मंगळवेढा/प्रतिनीधीभैय्या खिलारे
:पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्ष आश्विनी भापकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे सामाजिक कार्य पाहून काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे. आश्विनी भापकर या पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या गावापासून समाजसेवेच्या माध्यमातून अनेकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. पंढरपूर तालुका आणि इतर भागात समाजसेविका म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. आशा याआश्विनी भापकर यांना काँग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे. याचा काँग्रेसला पर्यायाने महाविकास आघाडीला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नक्की फायदा होणार आहे.
मंगळवारी सोलापूर येथे बोलावून त्यांना माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी आ. प्रणितीताई शिंदे, काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष शाईनताई शेख, चेतन नरोटे, पंढरपूरचे महेश अधटराव आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.






