कृतिशील नेता : संग्रामसिंह मोहिते पाटील
श्रेष्ठ अभिव्यक्ती म्हणून काही असते का ? असतेच असते. विचार ही सर्वश्रेष्ठ अभिव्यक्ती आहे पण नुसते विचार नव्हे तर विचार आणि त्यापाठोपाठ विचारानुकूल कृती ही श्रेष्ठ अभिव्यक्ती असते. आणि ही कृती विचारानुकूल कार्य आणि त्या कृती कार्यातील सातत्य ही सर्वश्रेष्ठ अभिव्यक्ती म्हणावी लागते. श्री संग्रामसिंह मोहिते पाटील आपल्या सर्वांचे आण्णासाहेब हे विचार आणि कृती या दोन्ही माध्यमातून व्यक्त होणारे बहुपरिचीत व्यक्तीमत्व. जनतेच्या जीवनात सुखाचे, दुःखाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी आपल्या माणसाच्या मागे ठामपणे उभी राहतात. अशा माणसात प्रथम स्थान कुनाचे तर आण्णासाहेबांचे. स्वतः मात्र प्रसिध्दीपासून दूर राहून माळशिरस तालुक्यातील गरजूंना वेगवेगळ्या पध्दतीने निःस्वार्थपणे आजही गाजावाजा न करता मदत करत असतात
.तत्वनिष्ठ, गुणांनी, विचारांनी, समाजाला प्रेरणा देणारे, कार्याने अतिशय उंची गाठलेल्या लोकांचे संस्कार, वारसा लाभलेले व त्यांच्या कामातून घडत गेलेले आण्णासाहेब यानी आपल्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीत २००५ पासून आशिया खंडातील सर्वात मोठी असलेली अकलूज ग्रामपंचायतीत सदस्य, उपसरपंच आणि सरपंच पद भूषवून अकलूजच्या विकासाला गती देऊन अकलूजचा चेहरामोहराच बदलून टाकला. स्वतः चे घर असावे प्रत्येकाचे स्वप्न असते. अकलूजमधील गरीब, कष्टकरी, कामगारांचे हे स्वप्न घरकुलांच्या माध्यमातून आण्णासाहेबांनी पूर्ण केले. विकासनगर झोपडपट्टीत लाईट, पाणी व रस्ता या सुविधा दिल्या. गावातील लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी घरपोच म्हणजे वाँटरसप्लाय सुरू केली. सिमेंट रस्ते, भव्य अशी ग्रामपंचायत इमारत उभी केली.
तसेच मध्यमवर्गातील लोकांना व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाळे बांधून दिले. शिवसृष्टी उद्घाटन सोहळा, गौरव मराठी मातीचा, गौरव भारतीय लोककलेचा, प्रजासत्ताक दिन अशा वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात आपले मोलाचे योगदान. तसेच ग्रामीण भागातील मुलांना खेळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे म्हणून अद्ययावत इंडोर स्टेडियम उभारले.इनोव्हेशन आणि इन्व्हेन्शन दोन्हीही गोष्टी विद्यार्थ्यांना मारूनमुटकून शिकवून जमत नसतात. त्या चौकसबुद्धी, चुणचुणीतपणा आणि मेहनतीचा परिपाक असतात.
प्रश्न शोधण्याची नजर आणि उत्तर शोधण्याची चिकाटी ओळखून केंद्र सरकारच्या मदतीने तीन विद्यालयात “अटल टिंकरिंग लॅबोरेटरीज’ (ATL) सुरू केल्या. शालेय विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची संस्कृती (इनोव्हेशन) बिंबवणे हा त्यांचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारिरीक विकास व्हावा यासाठी आपले प्रयत्न दिसतात. ६३९० खेळाडूंना सहभागी करून पारंपरिक खेळ लेझीम भव्यदिव्य प्रदर्शन केले. ग्रीनीज वर्ल्ड बुकमध्ये त्याची नोंद झाली.
सामाजिक बांधिलकी जपत मित्रमंळाच्या सहाय्याने २००३ पासून सलग सतरा वर्षे रक्तदान शिबिर आयोजित करून हजारो लोकांना संजीवणी दिली. ४५ हजार पेक्षा जास्त खेळाडूंना लेझीम चे प्रशिक्षण दिले. तसेच वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता अभियान, अस्थिरोग व दंतरोग तपासणी उपचार, अवयवदान नोंदणी शिबीर, व्यसनमुक्ती शिबीरे आयोजित केली. तसेच लेझीम, बँडमिंटन, बुद्धिबळ, लेदर व टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धा, कबड्डी खुला गट, बालक्रीडा अशा अनेक खेळांचे राज्यस्तरीय स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन, नियोजन केले.वाह वाह करणाऱ्या शेकडो व्यक्तिंपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती आयुष्याला यशाच्या मार्गावर नेण्यासाठी पुरून उरते.
मोठ्या मनानं आणि सढळ हातानं कौतुक करणारं. आढेवेढे न घेता सरळ बोलणं..तोंडावर स्पष्ट बोलणं..असं लोकविलक्षण नेतृत्व म्हणून आण्णासाहेबांची या पंचक्रोशीत ख्याती आहे,कित्येक गोरगरीब,गरजूंना, विद्यार्थ्यांना निःस्वार्थपणे आजवर यथासांग केलेली मदत-सहकार्य सर्वश्रुत आहे.निःस्वार्थ सत्कार्य हीच आण्णासाहेबांची ओळख जनसामान्यांमध्ये दृढ आहेत. माणुसकीनं-स्नेहानं माणसं कमवावी लागतात. कित्येकांच्या समस्येवर आण्णासाहेबांनी आपुलकीनं मात केली. मूर्तीच्या स्वरूपातल्या देवापेक्षा देवत्वाचा प्रत्यय देणारी माणसं पूजनीय वाटतात. आदरणीय आण्णासाहेबांना ते उद्दिष्ट थोरामोठ्यांच्या आशीर्वादानं-मार्गदर्शनानं लाभलंय-गवसलंय..!अशा किती तरी आठवणींचा-गोष्टीचा साक्षीदार म्हणून संवेदनशील मनाला भाषेचा सुगंध… त्यातल्या अनुभव संपन्न शब्दांमधून व्यक्त होताना चिरकाल राहतात मनात-हृदयात.!आपण प्रत्येकाला पाठबळ आणि आपुलकीची थाप देऊन अनेक माणसं जोडलीत…त्या माणसांमध्ये आम्हीं एक आहोत ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे..! आपण कायम आठवणीत सर्वांच्या राहणारे, काम करणारे म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त तुम्हाला आमच्या सर्वांकडून आपुलकीच्या शुभेच्छा…..
!प्रा. तात्यासाहेब शिवाजी काटकर, अकलूज9226144836(लेखक करिअर समुपदेशक असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक विषयावर लेखन करतात)







