प्रदीपबाबांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य येणाऱ्या काळात सतत प्रेरणादायी ठरेल —- प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांचे भावोद्गार
कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर ) / ता . १७: ” माजी आमदार कै. यशवंत एकनाथ पाटील यांचा राजकीय वारसा असताना त्यांचें सुपुत्र प्रदिपबाबा यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अतिशय प्रामाणिकपणे काम केले. त्यांचे कार्य येत्या काळात प्रेरणादायी ठरेल,” असे भावोद्गार प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांनी काढले.
येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित प्रदिपबाबांच्या जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. प्रारंभी त्यांच्या हस्ते प्रदिपबाबांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली.
याप्रसंगी स्मिता कळंत्रे आणि पौर्णिमा पाटील या विद्यार्थी – शिक्षकांनी प्रदिपबाबांच्या कार्याचा आढावा घेणारी भाषणे केली. सुभाष चौगुले यांनी प्रास्तविक केले. सुप्रिया कार्वेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रगती पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सृजनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकास विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका गुलनास मुजावर , प्रा. संजय जाधव, प्रा. ए. के. बुरटुकणे, एस. के. पाटील, अनिल इंदुलकर, ग्रंथपाल सूरज इंगळे आणि तानाजी मोहिते यांनी परिश्रम घेतले.







