अचूक निदानाकरिता रक्त चाचण्या महत्वाच्या…….डॉ.बाळकृष्ण गायकवाड
कोल्हापूर…

श्री.विजय भोसले व डॉ. प्रज्ञा चिमणकर यांच्या शाहूपुरी, कोल्हापूर येथील “लॅब टेक पॅथॉलॉजीच्या” उद्घाटन समारंभ मोटिवेशनल स्पीकर (प्रेरक वक्ते) डॉ. संदीप पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे मा.उपाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण गायकवाड ,जीपीए कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ. राजेश सातपुते,वेणूताई चव्हाण होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ. श्रीधर पाटील, जीपीए कोल्हापूरचे सेक्रेटरी डॉ. हरीश नांगरे, डॉ .जयदीप पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी उद्घाटन पर भाषणात बोलताना डॉ.संदीप पाटील यांनी धावपळीच्या, धकाधकीच्या जीवनामध्ये माणसांचा शरीराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असून मोह ,माया यामध्ये माणूस गुंतत चाललेला आहे.त्यामुळे शरीराचे फार नुकसान होते . आपणाला कळत नाही की, आपणास काय झाले यासाठी वर्षातून कमीत कमी एकदा तरी आपल्या शरीराच्या वैद्यकीय तपासण्या करणे गरजेचे असून यातून आपल्याला भविष्यामध्ये कोणता आजार होऊ शकतो याची माहिती मिळू शकते व या माहितीच्या आधारावरच आपण आपली जीवनशैली कशा रीतीने बदलू शकतो हे सांगत वैद्यकीय तपासण्या वेळेवर करणे गरजेचे असल्याचे सांगत सर्वांनी आपली दिनचर्या करत असताना मनावर ताण तणाव कमी यावा व आपण सुखी जीवन जगावे यासाठी व्यायामाकडे लक्ष देणे गरजेचे असून आपण आहार व विहाराकडे लक्ष देणे सुद्धा महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगितले.
प्रमुख पाहुणे डॉ. बाळकृष्ण गायकवाड यांनी व्याधीमुक्त जीवनशैली जगायची असेल तर वेळच्यावेळी रक्तातील तपासण्या करून घेणे आवश्यक असून त्या तपासण्यामुळे भविष्यात होणारे आजार आपण वाचवू शकतो. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आपणास भविष्यामध्ये काय उद्भवू शकते हेही समजत असल्याने प्रत्येकाने वैद्यकीय चाचण्या करणे गरजेचे असल्याचे सांगत लॅबटेक लॅबोरेटरीला शुभेच्छा दिल्या.यावेळी जीपीएचे अध्यक्ष डॉ. राजेश सातपुते यांनी सुद्धा लॅबटेक लॅबोरेटरी ही कोल्हापूरकरांसाठी जीवनदायी ठरेल असे सांगत या ठिकाणी अनेक प्रकारच्या अत्याधुनिक वेगवेगळ्या तपासण्या होत असल्याचे सांगत याचा सर्व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे सांगितले.
यावेळी लॅबटेक लॅबोरेटरीचे सर्वेसर्वा श्री. विजय भोसले तसेच डॉ.प्रज्ञा चिमनकर यांनी लॅबटेक लॅबोरेटरी मध्ये रक्त ,लघवीच्या तपासण्यापासून कॅन्सरच्या तपासण्यापर्यंत मुख्यत्वे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण, साखरेचे प्रमाण, काविळीचे प्रमाण, संधिवाताचे प्रमाण, चिकनगुण्या, डेंगू, मलेरिया , थायरॉईड, हार्मोन,रक्तगट अशा सर्व प्रकारच्या तपासण्या एकाच छताखाली होणार असल्याचे सांगितले. जे गरजू पेशंट आहेत, ज्यांना हॉस्पिटलमध्ये अथवा लॅबमध्ये येता येणार नाही अशांसाठी सवलतीच्या दरामध्ये घरी जाऊन सेवा देणार असल्याचे सांगितले.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी लॅबटेक लॅबोरेटरीचा लाभ घ्यावा.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजय भोसले यांनी केलं तर आभार रामभाऊ भोसले यांनी मानले.







