रामजन्मभूमी अयोध्या येथून पुजाविधी करून आणलेल्या मंगल अक्षता कलश च्या नगरप्रदक्षिणा चे रविवारी अकलूज येथे आयोजन
अकलूज (प्रतिनिधी )अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत *प्रभू श्रीरामलल्ला* जन्मस्थळी २२ जानेवारीस विराजमान होणार आहेत. या ऐतिहासिक क्षणानिमित्त अयोध्येतून *मंगल अक्षता* पूजाविधी करून अकलूजमध्ये दाखल झाल्या असून, अक्षता व श्रीरामांच्या प्रतिमेची नगर प्रदक्षिणा पारंपारिक वाद्याच्या गजरात अकलूज येथे होणार आहे,
तरी आपण सहपरिवार सहभागी व्हावे.असे आवाहन अकलूज येथील रामभक्त यांनी केले आहे.या मंगल प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी पुरुषांनी पांढरा कुर्ता पायजमा व भगवी टोपी .(पांढरा कुर्ता पायजमा नसेल तर पारंपारिक वेश कोणताही चालेल.)महिलांनी कलश किंवा तुळशी वृंदावन घेऊन सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
रविवारी १७-१२-२०२३ रोजी सकाळी ८.३० वाजता नगर प्रदक्षिणा होणार आहे. नगर प्रदक्षिणा मार्ग-: हनुमान मंदिर जुने ग्रामपंचायत – आंबेडकर चौक- जुने बस स्थानक-जुने पोलीस स्टेशन-गांधी चौक – जयशंकर उद्यान-विजय चौक – शिवापूर पेठ – हनुमान मंदिर.
अकलूज आणि परिसरातील रामभक्त यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन करण्यात आले आहे.







