अकलूज येथील शासकीय जागेवर अतिक्रमण, कारवाई होणार का?
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील शासकीय जागेवरील अतिक्रमण बाबत अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी माहितीच्या अधिकार खाली भूमीअभिलेख माळशिरस यांच्या कार्यालय कडे जावक क्रमांक 2441नुसार 29-08-2022 रोजी अर्ज दाखल केला होता.त्यानंतर भूमिलेख अधिकारी यांनी संबंधित अधिकारी यांना पत्र देऊन सदर जागेची मोजणी करून अहवाल देण्यास सांगितले होते
.त्यानुसार त्यांनी 03-08-2022रोजी सदर शासकीय जागेची पाहणी करून,मोजमाप घेऊन नकाशा तयार करण्यात आला होता.त्यामध्ये सदर शासकीय जागेत खाजगी इसमाचे अतिक्रमण झाल्याचे आढळून आले होते.
त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक जमीन 03/2009/प्र.क्र.13 ज -1,7सप्टेंबर 2010च्या अनुषंगाने सरकारी जागेवरील अतिक्रमण तात्काळ दूर करून तसा अहवाल कार्यालय कडे सादर करावा.असे पत्र 28-11-2022रोजी अधिकारी यांना पाठविले होते.
परंतु,तब्बल एक वर्ष उलटून गेले तरी अद्याप अहवाल सादर केला नाही. याबाबत तर्क -वितर्क लढविले जात आहेत.दरम्यान शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या विरुद्ध काय कारवाई होते. याकडे लक्ष लागले आहे.






