संग्रामनगर ग्रामपंचायत अस्वच्छतेच्या विळख्यात. नागरिकांचे आरोग्य धोक्यात
अकलूज (प्रतिनिधी ) माळशिरस तालुक्यातील संग्रामनगर ग्रामपंचायत ही अनेक समस्याच्या विळख्यात सापडली असून, गेल्या 7ते 8वर्षापूर्वी येथील सुमित्रा कॉलनी च्या पाठीमागे झालेल्या बिगरशेती प्लॉटिंग मधील नागरिकांना अनेक समस्या भेंडसावत आहेत,
या ठिकाणी अनेक गोरगरीब नागरिकांनी प्लॉट खरेदी केले आहेत. सदरचे प्लॉट खरेदी करताना प्लॉट मालकांनी आम्ही तुम्हाला रस्ते, ड्रेनेज लाईन्स, लाईट, पिण्याचे पाणी देऊ, असे आश्वासन दिले होते, परंतु गेल्या तीन चार वर्षापासून या ठिकाणी कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. सध्या या परिसरात सुमारे 10 ते 15 कुटुंबातील व्यक्ती वास्तव्य करीत आहेत, त्यांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे.
या प्लॉट मध्ये सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून, त्यामुळे येथील कुटूंबाना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या ठिकाणी पूर्वी कचरा कुंडी होती. परंतु यातील कचरा कधीच उचलून नेला जातनव्हता.. त्यामुळे कचरा कुंडी भरून कचरा आजूबाजूला पडलेला असायचा. त्यामुळे ती कचरा कुंडी परत उचलूननेली.त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे ग्रामपंचायत ने आठवड्यातुन किमान एकदा तरी येथील कचरा उचलून न्यावा. अशी मागणी येथील रहिवाशी करीत आहेत. त्याचप्रमाणे येथे असलेल्या घाणीच्या साम्राज्या मुळे या ठिकाणी गाढव, डुक्कर अशा मोकाट जनावरांचा वावर देखील वाढला आहे. त्याचाही येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
त्याचप्रमाणे या ठिकाणी गणेशोत्सव मंडळ आहे. त्या ठिकाणी गणपती ची मूर्ती आहे. परंतु या ठिकाणी परिसरात सर्वत्र अस्तव्यस्त कचरा पडलेला आहे. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे निदान आठवड्यातुन एकदा तरी हा कचरा उचलला जावा. अशी मागणी होत आहे.
काही महिन्यापूर्वी या ठिकाणी गटारीचे काम करण्यात आले आहे. परंतु दोन रस्त्याला जोडणाऱ्या ठिकाणी नागरिकांना ये -जा करण्यासाठी गटारीवर स्लॅब टाकण्यात आला आहे. परंतु तो अरुंद टाकला आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या नागरिकांना,शालेय, महाविद्यालयीन तरुणांना या रस्त्यावरून वाहन घेऊन जाणे जिकिरीचे ठरत आहे.तसेच फोर व्हीलर वाहनाना तर मोठी कसरत करावी लागत आहे. हा स्लॅब वाढविणे गरजेचे आहे. अन्यथा वाहने गटारीत जाऊ शकतात.लहान मुले, महिला, वृद्ध यांना ये -जा करणे अवघड झाले आहे. अनेक नागरिक,महिला, विद्यार्थी या रस्त्यावरून टू व्हीलर घेऊन जातअसताना घसरून पडले आहेत. त्यामुळे हा स्लॅब वाढविणे अत्यंत गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे या ठिकाणी अंतर्गत रस्ता मंजूर झाला आहे. परंतु अद्याप त्याचे काम सुरु झाले नाही.संग्रामनगर ग्रामपंचायत ने या गोष्टी कडे लक्ष देऊन सदर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अशी मागणी जोर धरू लागली आहे.






