अकलूज वरून कुर्डूवाडी ला जाण्यासाठी पहाटे 4वाजता एसटी सेवा सुरु
अकलूज :(प्रतिनिधी )वंदे भारत रेल्वेने कुर्डूवाडी येथून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी अकलूज आजारातून दररोज पहाटे चार वाजता बस सेवा सुरू केली असून त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन आगार प्रमुख प्रमोद शिंदे यांनी केले.वंदे भारत ही मुंबईकडे जाणारी रेल्वे कुर्डूवाडी येथे येथून सकाळी सहाच्या दरम्यान सुटत असल्याने या रेल्वेने प्रवास करणाऱ्या अकलूजच्या प्रवाशांसाठी अकलूज येथून १डिसेंबर पासून पहाटे चार वाजता अकलूज कुर्डवाडी ही बस सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. तर मुंबईवरून परतणाऱ्या प्रवाशांसाठी कुर्डूवाडी येथून रात्री 10 वाजता कुर्डूवाडी अकलूज ही बस सेवा सुरू असल्याची ही माहिती श्री शिंदे यांनी दिली.






