अकलूज नगरपरिषद हद्दीतील सर्वांनी अनधिकृत जाहिराती न लावण्याचे नगरपरिषद च्या वतीने आवाहन
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज नगरपरिषद हद्दीतील सर्वअकलूज नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांना, वाणिज्य संस्था, जाहिरात संस्था, सामाजिक संस्था, राजकीय संस्था यांना अकलूज नगरपरिषद यांचे वतीने आवाहन करण्यात आले असून,मा. उच्च न्यायलयीन प्रकरण PIL १५५/२०११ अनधिकृत जाहिराती घोषणा फलक होर्डिंग्स बाबत जनहित याचिका दाखल आहे.
शहरातील नागरिकांनी , वाणिज्य संस्था, जाहिरात संस्था, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांनी नगरपरिषद हद्दीतील कोणत्याही प्रकारचे अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग्स,पोस्टर्स इ. उभारण्यात येवू नये. प्रथम दर्शनी अनधिकृत जाहिरात उभारल्याचे निदर्शनास आल्यास आपल्या संस्थेकडून योग्य ती शास्ती वसूल करून मालमत्ता विरूपण प्रतिबंधात्मक कायदा १९९५ नुसार दंडात्मक कारवाई करणेत येईल याची नोंद घ्यावी.
असे आवाहन अकलूज नगरपरिषद चे मुख्याधिकारीदयानंद गोरे यांनी केले आहे.






