पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत पश्चिम महाराष्ट्र महिला जनसंपर्क प्रमुख या पदी श्रीमती विजयाताई नामदेव कर्णवर यांची निवड
मुंबई । : (प्रतिनिधी) पोलीस मित्र संघटना नवी दिल्लीमहिला आघाडी पश्चिम महाराष्ट्रच्या जनसंपर्क प्रमुख या पदी श्रीमती विजयाताई नामदेव कर्णवर यांची निवड करण्यात आली. यांची निवड पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली या संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते मा. श्री संतोषदादा चौधरी यांच्या आदेशानुसार व कामगार नेते मा. श्री जि. एम. भगत सर राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख यांनी केलेल्या सुचनेनुसार, मा. नगराध्यक्ष खोपोली तथा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश मा. श्री. सुनीलभाऊ पाटील यांच्या सहमतीने सिने ,अभिनेत्री मा. अदितीताई पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी यांच्या वतीने.करण्यात आली. विजया कर्णवर ह्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष या पदावरती कार्यरत होत्या, यांनी सोलापूर जिल्ह्यामधील तालुका गाव पातळीवरती सभासद अभियान राबवून संघटना बळकटी देण्याचे कार्य केले. मॅडम यांच्या सामाजिक क्षेत्रात व राजकीय, पत्रकार आणि अनेक संघटना मध्ये केलेल्या कामचे व संघटनेचे महत्त्व ओळखून पोलीस व नागरिकांना मदत कराल व संघटनेची प्रतिमा उज्ज्वल कराल, असा संघटनेचा ठाम विश्वास आहे. विजया कर्णवर यांच्या निवडीचे सर्व परिसरातील अनेकांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे.सोलापूर जिल्हा पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत







