अकलूजचा घोङे बाजार फुलला.उदघाटन अगोदरच खरेदी विक्री जोमात.पाच कोटीची उलाढाल होणार
अकलूज – अकलूजच्या घोङे बाजारात घोङ्यांची आवक वाढली असून उद्घाटनापुर्वीच परराज्यातील व्यापा-यांनी खरेदीचा सपाटा लावला आहे. आज अखेर सुमारे ५० लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहीती सभापती मदनसिंह मोहीते पाटील यांनी दिली.
कोरोना कालावधीमध्ये घोङे बाजारावर प्रतिकुल परिणाम झाला होता. परंतू यावर्षी बाजार सावरला असून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, बिहार राज्यातील व्यापारी घोङे बाजारात दाखल झाले आहेत. या व्यापा-यांचे ६३० घोङे बाजारात विक्रीसाठी आले असून त्यातील ४२ घोङ्यांची विक्रीही झाली. ४२ घोङ्यांच्या विक्रीतून ५० लाखांची उलाढाल झाली आहे.
तामिळनाङूच्या व्यापा-यांनी उत्साहाने या बाजारात खरेदी केल्याचे समजते.दीपावली पाङव्याला घोङे बाजाराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तेथुन पुढे खरा बाजाराला रंग भरतो. कर्नाटक, तामिळनाङु, राजस्थान, गुजरातमधील व्यापारी सध्या वाटेवर आहेत. यावर्षी सुमारे दिङ हजार घोङे बाजारात येतील व खरेदीदार व्यापा-यांचा उत्साह पाहता सुमारे ५ कोटींची उलाढाल होईल असा अंदाज मार्केट कमिटीचे सचिव राजेंद्र काकङे यांनी वर्तवला
.या बाजारामुळे स्थानिक चारा, पेंङ, पिठ, हरभरा, दुध, खोगिर, सजावटीचे सामान विक्रेत्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याने येथेही मोठी उलाढाल होते. व्यापा-यांच्या सोयीसाठी बाजार परीसरात औषध फावारणी, जनावरांचे ङाॕक्टर, स्वच्छता, लाईट, पाणी, निवारा, संरक्षण यांची बाजार समितीने उत्तम व्यवस्था केलेली आहे.
*अकलूजला घोडेबाजार सुरू होण्याचे कारण.*
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात घोडेबाजार भरत होता २००९ नंतर अकलूजला घोडेबाजार भरू लागला या गोष्टीला अनेकांनी राजकीय रंग दिला.मात्र कार्तिकीला यात्रेला पंढरपुरात भरत असलेल्या घोडेबाजार अकलूजला येण्यामागे महत्वपूर्ण कारण एक होते ते घोड्याना होणारा ग्लॅनडर नावाचा संसर्गजन्य रोग आणि माणूस त्यांच्या संपर्कात आला तर माणसांना देखील रोग होण्याची संभावना होती..
महाराष्ट्रात पाचगणी सातारा येथे घोड्यात या गॅलनडर रोगाची लक्षणे दिसली होती हे लक्षात घेता पंढरपुरातील टांगेवाल्याना देखील टांगा चालवाला निर्बंध घातले होते.कार्तिकी एकादशी यात्रेच्या तोंडावर पंढरपुरात घोडेबाजार चालू करण्यास स्थानिकांचा प्रचंड विरोध झाला होता.
स्थानिक प्रशासनाने देखील हात वर केलेले होते. जवळपास पंढरपुरात घोडेबाजार भरणार नसल्याचे निश्चित झाले होते सोलापूर जिल्ह्याचे कायमच सामाजिक राजकीय पालकत्व घेतलेले मोहिते-पाटील कुटूंबाने या गोष्टीकडे लक्ष घातले..
पंढरपुरात भरणारा घोडेबाजार जिल्ह्याच्या बाहेर जाऊ नये.. व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी घोडे व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन पुढाकार घेतला व्यापाऱ्यांना आर्थिक मदत केली व विजयदादांच्या मार्गदर्शनपर अकलूज कृ.उ.बाजार समितीच्या माध्यमातून अकलूजला घोडेबाजार भरवला.ग्लॅनडर या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर अकलूज कृ.उ.बाजार समितीने प्रत्येक घोड्याला बांधण्याच्या ठिकाणी सावली, मोफत चोवीस तास पाणी,औषधांची फवारणी, व्हेटरनरी डाॅक्टरांची टिम उपलब्ध करून दिली.या दर्जाच्या सुविधा देऊन पंढरपुराच्या ऐवजी अकलूजला २००९ ला पहीला घोडे बाजार भरून यशस्वीरित्या पार पडला.. आज तागायत या सर्व सोयी घोडे बाजाराला मोफत पुरवल्या जातात.
पडद्या पाठीमागील गोष्ट सांगण्याचा उद्देश कोणतीही गोष्ट सुरू करण्यास पुढाकार घ्यावा लागतो. राजकारणा असो की समाजकारण, धैर्यशिल मोहिते-पाटील हा माणूस पुढाकार घेणारा नेता आहे.
समाधान वाघमारे








