पंढरपूर येथे 5ऑक्टोबर ला मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेसाठी माळशिरस तालुक्यातुन दहा हजार बांधव उपस्थित राहणार
अकलूज (प्रतिनिधी ) मराठा आरक्षणासंदर्भात शिवश्री मनोज जरांगे-पाटील यांची पंढरपूर, छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी गुरुवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6-30 वा पंढरपूर, माळशिरस व सांगोला या तीन तालुक्यातील मराठा समाज बांधवांची सभा आयोजित केली आहे.
या सभेला जाण्यासाठी माळशिरस तालुक्यातील सकल मराठा समाज यांच्या वतीने नियोजन करण्यासाठी मंगळवार 3ऑक्टोबर रोजी अकलूज येथे संध्याकाळी 5वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या बैठकीसाठी फोर व्हीलर आणि टू व्हीलर, खाजगी ट्रॅव्हल्स च्या माध्यमातून किमान आठ ते दहा हजार पुरुष, महिला, मुले सभेला जाणार आहेत. असे नियोजन करण्यात येणार आहे.
तरी माळशिरस तालुक्यातील बांधवानी जास्तीत जास्त संख्येने आपापल्या जबाबदारी वर या ठिकाणी उपस्थित राहावे. असे आवाहन सकल मराठा समाज ,माळशिरस तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी नियोजन बैठकीला बहुसंख्येने बांधव उपस्थित होते.







