जि. प.प्रा.शा चाहुरवस्ती येथील विद्यार्थ्यांनी घडविले प्रामाणिकपणाचे दर्शन.सापडलेले पाकीट केले परत.
अकलूज (प्रतिनिधी )3ऑक्टोबर रोजी माळशिरस तालुक्यातील जि. प.प्रा.शा चाहुरवस्ती या ठिकाणी इयत्ता सातवी मध्ये शिकणारा विद्यार्थी गुरुराज पांडुरंग धाईंजे व प्रशांत बाळू वाघमोडे यांना एका अनोळखी व्यक्तीचे पॉकेट सापडले. यामध्ये रोख रक्कम 870 रुपये तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड ही महत्त्वाची कागदपत्रे होती. बापूराव धुळदेव देवकाते यांचे ते पॉकेट त्यांचा शोध घेऊन त्यांना देण्यात आले.
याबद्दल त्यांनी गुरुराज व प्रशांत चे शैक्षणिक साहित्य देऊन अभिनंदन केले.दरम्यान विद्यार्थ्यांच्या या प्रामाणिक पणाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अनिल भगत यांनी देखील विद्यार्थी यांचे कौतुक केले.
सध्या ज्या शाळेचा पट 20पेक्षा कमी आहे. अशा शाळा बंद करण्याचा घाट घातला जात आहे. परंतु ग्रामीण भागात चालू असलेल्या जि. प शाळेचे विद्यार्थी यांचेवर देखील आई, वडील, शिक्षक, मुख्याध्यापक चांगले संस्कार करीत असतात. तसेच विद्यार्थी यांना शिक्षण देखील उच्च प्रतीचे मिळत असते.जि. प शाळा देखील विद्यार्थी यांना शिक्षण देऊन घडविण्याच्या बाबतीत कोठेही मागे नाहीत. त्यामुळे शासनाने जि. प शाळा बंद करू नयेत. असाही सुरु पालकांमधून उमटत आहे.या विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.







