कोल्हापूर येथे डॉ.संजीव डोळे व डॉ.ज्ञानेश्वर पवार यांची होमिओपॅथिक कार्यशाळा उत्साहत संपन्न…
कोल्हापूर …होमिओपॅथी हे सर्वात प्रभावी, सुरक्षित उपचार पद्धती असली तरी या मध्ये उपचार करणं हे आव्हानात्मक आणि थोडंसं क्लिष्ट असल्याची भावना असल्याने बहुतांश होमिओपॅथीक पदवीधर हे तुलनेत सोपी असलेली ऍलोपॅथी उपचार पद्धती अवलंबतात पण अतिशय सोप्या पद्धतीने आणि आपल्या रोजच्या दैनंदिन पेशंटमध्ये कशी प्रभावीपणे वापरून रुग्णांना फक्त होमिओपॅथिक औषधांनी लवकरात लवकर कसं बरं करता येईल याच बहुमूल्य मार्गदर्शन पुणे येथील प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉ.संजीव डोळे सर यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना ,वेणूताई चव्हाण होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज,दसरा चौक,कोल्हापूर व ऍडवेन होमिओपॅथिक कंपनी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.प्रत्येक ऍलोपॅथी करणाऱ्या होमिओपॅथिक डॉक्टरने आपल्या पेशंटना आधी होमिओपॅथिक औषध देऊन बघितलेच पाहिजे अश्या प्रकारे त्यांनी उपस्थित डॉक्टरांचा आत्मविश्वास वाढवला. बारामतीचे होमिओपॅथी तज्ञ डॉ.ज्ञानेश्वर पवार यांनी होमिओपॅथी घराघरात पोहचवण्यासाठी होमिओपॅथी डॉक्टरांनी रुग्णामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे असल्याचे सांगत सहज,सोप्या पद्धतिने रुग्णामध्ये परिणामकारक उपाय उदाहरणासह उपस्थित डॉक्टरांना पठवून सांगितले.
यावेळी महाराष्ट्र कॉन्सिल ऑफ होमिओपॅथीचे मा.उपाध्यक्ष डॉ बाळाकृष्ण गायकवाड,वेणूताई चव्हाण होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे सचिव डॉ.नितीन बेलनेकर,वेणूताई चव्हाण होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेश कागले,मा.प्राचार्य डॉ.श्रीधर पाटील,वेणूताई चव्हाण होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ.संदिप पाटील,ऍडवेन होमिओपॅथिक कंपनीचे बिझनेस मॅनेजर मुजुमदार,संघटनेचे उपाध्यक्ष डॉ.जयवंत पाटील,खजिनदार डॉ.मनोज भोपळे उपस्थित होते.
कार्यशाळचा कोल्हापूर जिल्ह्यातील 150 होमिओपॅथिक डॉक्टरांनी लाभ घेतला.सर्वांचे स्वागत संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.शामप्रसाद पावसे यांनी केले.पाहुण्यांची ओळख डॉ.संदीप पाटील यांनी केली .सूत्रसंचालन डॉ श्वेता शाह तर आभार सचिव डॉ.श्रीकांत लंगडे यांनी मानले.















