अकलूज नगरपरिषद हद्दीतील सर्व दिव्यांग बांधवांनी सोलापूर येथे कार्यक्रमास जाण्यासाठी अकलूज नगरपरिषदेशी संपर्क साधावा.-दयानंद गोरे
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज नगरपरिषद अकलूज यांचे वतीने अकलूज नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात आले असून,महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग आयोजित दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान अंतर्गत विविध योजनांची माहिती व लाभ वाटप जिल्हास्तरीय कार्यक्रम बुधवार दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक सभागृह, श्री.सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना कुमठे, होडगी रोड,सोलापूर येथे आयोजित केले आहे. तरी अकलूज नगरपरिषद हद्दीतील सर्व दिव्यांग बांधवांनी सदर कार्यक्रमास जाण्यासाठी अकलूज नगरपरिषदेशी संपर्क साधावा.असे आवाहन अकलूज नगरपरिषद अकलूज यांचे वतीने मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले आहे.






