सोलापूर,शेळगी येथील सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह आणि जवाहरलाल नेहरू वसतिगृह च्या विविध मागण्यांबाबत विद्यार्थ्यांचे आंदोलन
सोलापूर (प्रतिनिधी )शेळगी येथील सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह आणि आजी/माजी विद्यार्थी नेहरू वसतिगृह च्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन केले.
यासंदर्भात अधीक माहिती अशी की,सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृहआणि जवाहरलाल नेहरू वसतिगृह तात्काळ सुरू करण्याबाबत विद्यार्थी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत.पण वेळोवेळी आश्वासन देऊन ही कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.वसतिगृहात प्रवेश घेणारी मुले ही ग्रामीण भागातील शेतकरी,कष्टकरी व गोरगरीब कुटुंबातील आहे.
प्रशासनाकडुन सातत्याने जी भाडेवाढ केली जाते ती विद्यार्थ्यांना परवडणारी नाही.या वर्षी फी 7100/-रु केली आहे ती फी 3100/- रु करावी जेणेकरून ग्रामीण भागातील मुलांना व मुलींना परवडेल.
तसेच वसतिगृहाचे खाजगीकरण झाले नाही पाहिजे.नेहरू वसतिगृह व सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह हे मुलांच्या शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी आहे.ग्रामीण भागातील मुलांना शहरात येऊन शिक्षण घेता यावे या हेतूने हे वसतिगृह बांधण्यात आले आहे.त्याच्यावर प्रशासनाचीच देखरेख असणे गरजेचे आहे.विविध माध्यमातून वसतिगृह खाजगी संस्थांना चालवण्यास देण्याच्या बऱ्याच बातम्या आल्या.वसतिगृहाचे खाजगीकरण होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.अशी खंत विद्यार्थी यांनी व्यक्त केली.
सर्व सोईसुविधा उपलब्ध करून वसतिगृह तात्काळ सुरू करण्यात यावे.प्रवेश शुल्कात वाढ करू नये.वसतिगृह खाजगी संस्थांना चालवण्यास देऊन त्याचे खाजगीकरण थांबवावे. अशा मागण्याचे निवेदन देण्यात आले. वसतिगृहाच्या संदर्भात अजून बऱ्याच गोष्टी आहेत परंतू सध्या या तीन आमच्या सर्व आजी/माजी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.या बाबी प्रशासनाकडून जोपर्यंत लेखी स्वरूपात मिळणार नाहीत तो पर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील.असे विद्यार्थी यांनी ठाम पणे सांगितले.
आज तागायत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान खुप मोठ्याप्रमाणात झाले आहे.वसतिगृह तात्काळ सुरू नाही झाल्यास विद्यार्थ्यांचे आणखीन नुकसान होणार आहे आणि यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहणार आहे.हे निवेदन देऊन ही या तीनही मागण्यांवर योग्य तो तोडगा नाही निगाला तर गणपती विसर्जनाच्या नंतर आम्ही विद्यार्थी संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या आधारे सर्व आजी/माजी विद्यार्थी शांततेच्या मार्गाने कोणालाही कसलाही त्रास न होता आमरण उपोषणाचा मार्ग निवडणार आहोत. याची ही प्रशासनाने नोंद घ्यावी.असा इशारा देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मुलांचे आणि मुलींचे इथून पुढचे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ प्रयत्न करावे अशी विद्यार्थ्यांनी विनंती केली .यावेळी जवाहरलाल नेहरू वसतिगृहातील आजी /माजी विद्यार्थी व सावित्रीबाई फुले मुलींचे वस्तीगृह येथील सर्व विद्यार्थीनी उपस्थीत होत्या .







