कोल्हापूर चे बेजबाबदार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची नार्को टेस्ट करा.-योगेश केदार
अकलूज (प्रतिनिधी )मराठ्यांच्या भावनांशी खेळणारे, खोटे बोलणारे कोल्हापूर चे बेजबाबदार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची नार्को टेस्ट करा.अशी मागणी मराठा वनवास यात्रेचे आयोजक योगेश केदार यांनी केली आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की यासाठी आम्हीही त्यासाठी तयार आहोत.आमचीही टेस्ट करावी.कोल्हापूर येथे झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत देखील ते उद्धटपणे बोलत असल्याचे दिसून आले. खोटे बोल पण रेटून बोल असे त्यांचे वागणे आहे. या राहुल रेखावर यांनी अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत ‘मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण दिल्यास काही भागात दंगली होतील असे वक्तव्य केले ते खरे आहे. ज्यावेळी त्यांनी हे वाक्य उच्चारले त्याच क्षणी केदार यांनी जिल्हाधिकारी साहेबांचा विरोध केला. त्यांनी त्यावेळी म्हटले की तुम्ही मंत्री महोदयांच्या उपस्थितीत माझा अपमान करत आहात. त्यांच्या या वाक्याचा देखील केदार यांनी विरोध केला होता. या सर्व प्रसंगावर त्यांनी फेसबुक पोस्ट देखील लिहिली होती. मुळात एखाद्या जिल्हाधिकारी साहेबांनी असे बेजबाबदार बोलणे अपेक्षित नाही. त्यांची आणि आमची देखील सखोल चौकशी करण्यात यावी. अशी मागणी योगेश केदार यांनी केली आहे.







