25 ऑगस्ट 2023 वार शुक्रवार रोजी कोटक महिंद्रा बँक महावीर पथ, गांधी चौक,शाखा अकलूज यांच्या वतीने नागपंचमी व रक्षाबंधन याचे अवचित्त साधून महिलांसाठी मेहेंदी स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धे साठी भरपुर प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेसाठी मार्गदर्शिका म्हणून शीतल दळवी मॅडम यांचं खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले.यावेळी कोटक महिंद्रा बँक अकलूज शाखेचे शाखाप्रमुख राजेंद्र मिसाळ, उप शाखाप्रमुख राहुल बधे आणि सर्व स्टाफ उपस्थित होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोटक महिंद्रा बँकेचे असिस्टंट मॅनेजर विशाल कुंभार यानी केले आणि असिस्टंट मॅनेजर आनंद निगडी यानी आभार मानले.मेहंदी स्पर्धाचे विजयी महिला खालील प्रमाणे.प्रथम पारितोषक पैठणी साडी गौरी आप्रे द्वतीय पारितोषिक सेमी पैठणी सनम शेख तृतीय पारितोषिक सिल्क साडी डॉ. मेघा जामदार उत्तेजनार्थ 1पारितोषिक ऐश्वर्या कुदळे उत्तेजनार्थ 2पारितोषिक अमृता सुतार या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेस भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच शाखेचे शाखाप्रमुख श्री राजेंद्र मिसाळ यांनी दिनांक 29 ऑगस्ट वार मंगळवार रोजी हेल्थ चेक कॅम्प आणि डोळे तपासणी शिबीर डॉ. निखिल गांधी अनुपम हॉस्पिटल अकलूज यांच्या उपस्थितीत कोटक महिंद्रा बँक शाखा अकलूज महावीर पथ गांधी चौक येथे होणार असल्याची माहिती दिली व याचा जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन या वेळी कोटक महिंद्रा बँक अकलूज शाखा यांच्या वतीने करण्यात आले आहे.






