• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home क्रीडा

प्रताप क्रीडा मंडळाच्या आट्यापाट्या स्पर्धेला दिमाखात प्रारंभ..

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 20, 2023
in क्रीडा
0
प्रताप क्रीडा मंडळाच्या आट्यापाट्या स्पर्धेला दिमाखात प्रारंभ..
0
SHARES
183
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रताप क्रीडा मंडळाच्या आट्यापाट्या स्पर्धेला दिमाखात प्रारंभ..

अकलूज (प्रतिनिधी) प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर अकलूज यांनी आयोजित केलेल्या भव्य आट्यापाट्या स्पर्धेला दिमाखात प्रारंभ झाला. सर्वाधिक बक्षिसे, सर्वाधिक संघांचा सहभाग व मोठा प्रतिसाद असणारी ही राज्यातील एकमेव स्पर्धा ठरावी. या स्पर्धेसाठी सुमारे एक लाख ३० हजाराची रोख बक्षीसे असून ८० संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे आयोजित केलेल्या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचे सहसचिव शरद गव्हार यांच्या हस्ते व प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा आट्यापाट्या संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब कापसे, उपाध्यक्ष राजकुमार मुंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी दिपकराव खराडे पाटील, अँड .नितीनराव खराडे पाटील, प्रदीपराव खराडे पाटील, स.म. कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव माने देशमुख, माजी उपाध्यक्ष अँड. प्रकाशराव पाटील, रामचंद्र सावंत पाटील, तसेच रावसाहेब मगर, लक्ष्मण शिंदे, रावसाहेब पराडे, महादेव घाडगे, राजेंद्र भोसले, गोविंद पवार, नानासाहेब मुंडफने, रामचंद्र सिद, महादेव अंधारे, विराज निंबाळकर, धनंजय सावंत, पांडुरंग एकतपुरे, वसंतराव जाधव, रामचंद्र गायकवाड, सुभाष दळवी, लक्ष्मण आसबे, मंडळाचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, सचिव पोपटराव भोसले पाटील, विविध संस्थांचे आजी-माजी संचालक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात स्पर्धा प्रमुख यशवंत माने देशमुख म्हणाले, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी ग्रामीण खेळांना प्रोत्साहन मिळावे यासाठी स्पर्धेला सुरुवात केली. हे स्पर्धेचे हे ३९ वे वर्ष आहे. या स्पर्धेसाठी दोन मैदाने आहेत. स्पर्धेसाठी ८० संघांनी नोंदणी केली आहे. प्रताप क्रीडा मंडळांने राबविलेल्या राज्य आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचाही त्यांनी आढावा घेतला.

शरद गव्हार म्हणाले, अकलूजकरांचे नियोजन हे राज्याला परिचित आहे. भविष्यात आट्यापाट्याच्या राज्यस्तरीय स्पर्धा अकलूजकरांना देण्याचे मी आश्वासन देतो.

बाबासाहेब कापसे म्हणाले, सोलापूर जिल्हा हा जगात आट्यापाट्या मध्ये प्रथम आहे. राजकुमार मुंबरे म्हणाले, राष्ट्रीय स्पर्धेपेक्षाही चांगले नियोजन अकलूज येथे असते. शालेय खेळात हा खेळ समाविष्ट केला आहे. २०१६ पर्यंत शासकीय सेवेत या खेळाला विशिष्ट कोठा होता. परंतु शासनाने शालेय गुनातून या खेळाचे पाच टक्के गुण वगळलेत. मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील यांचे पाठबळ आम्हाला मिळाल्यास आम्ही शासनाकडून तो कोठा पुन्हा मिळवू असे त्यांनी आश्वासित केले.

स्पर्धेत मुंबई १, माळशिरस ३९, पंढरपूर २४, माढा६, सांगोला ४, उस्मानाबाद ४, मंगळवेढा २ अशा तालुक्यातील एकूण ८० संघांनी सहभाग नोंदवला. प्रारंभी उद्घाटनाचा सामना सहकार महर्षी कारखाना अ विरुद्ध ब यांच्यात होऊन अ संघ विजयी ठरला. स्पर्धेचे सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी यांनी केले.

चौकट…१.. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांनी स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले. यामुळे खेळाडूंचा उत्साह द्विगुणीत झाला.

चौकट..२..या स्पर्धेसाठी सर्वाधिक बक्षिसे..प्रथम क्रमांकास रोख रुपये ४४ हजार व चषक, द्वितीय क्रमांकास रोख रुपये ३३ हजार, तृतीय क्रमांकास रुपये २२ हजार रोख, चौथा क्रमांकास रुपये ११ हजार रोख, व उपांत्य फेरीत पराजित होणाऱ्या चार संघांना प्रत्येकी ५ हजार रुपये रोख अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ
क्रीडा

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ

June 27, 2026
सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!*   *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त*                              -*पैलवान संग्राम कांबळे.*
क्रीडा

सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!* *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त* -*पैलवान संग्राम कांबळे.*

April 27, 2026
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन
क्रीडा

जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन

March 9, 2026
टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते
क्रीडा

टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते

March 8, 2026
क्रीडा

अकलूजमध्ये टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याचे मोठ्या एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपणरविवारी सायंकाळी ५ वाजता विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात भारत-न्यूझीलंड लढतीचा थरार

March 7, 2026
विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*
क्रीडा

विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*

March 2, 2026
Next Post
राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत व संवेदनशील नेता हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत व संवेदनशील नेता हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In