माण तालुक्यातील मौजे वरकुटे – मलवडी येथील सामान्य कुटुंबातून आलेली ऊसतोड कामगाराची सुकन्या काजल आटपाडकर हिची जर्मनी येथे होणाऱ्या चार राष्ट्रांच्या हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने सातत्याच्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण आपल्या माण तालुक्यातील कन्या म्हणून विशेष अभिमानही आहे. काजलचे आईवडील आजही मजुरी करतात. ती छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा प्रबोधिनीची खेळाडू आहे.

तिने मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल तिचे मनापासून अभिनंदन! तिच्या पुढील वाटचालीस भरभरून सदिच्छा.







