*गणपती फार्मसी मधील प्रा. महादेवी भोसले सुवर्ण पदकाच्या मानकरी*

अकोले (खु) ता.माढा. येथील श्री. गणपती औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापिका महादेवी मोहन भोसले यांनाडॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ लोणेरे रायगड अंतर्गत सुवर्णपदक मिळाले. एम. फार्मसी मध्ये फार्मासिटिकल केमिस्ट्री या विषयातून उच्चशिक्षण घेताना त्यांना सुवर्णपदक मिळाले.”फाइटोकेमिकल अँड फार्मकॉलॉजिकल इन्वेस्टीगेशन ऑफ बायोऍक्टिव्ह कोंस्टीट्यूएंटस इन रूट एक्सट्रॅक्ट्स ऑफ पार्किंनसोनिया ऍक्युलीयाटा लीन” या विषयावर त्यांनी आपला शोधनिबंध विद्यापीठास सादर केला. तसेच यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमध्ये ९ शोधनिबंध प्रकाशित केले आहेत व अविष्कार या विद्यापीठाच्या पोस्टर सादरीकरण स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवले आहे. सध्या त्या श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल सायन्सेस अँड रिसर्च, टेंभुर्णी या महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे काम करत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे, प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, सचिव डॉ.आर. डी. बेंदगुडे, प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे, सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.






