जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रावबहाद्दूर गट( बिजवडी )येथे जागतिक योग दिन साजरा
अकलूज (प्रतिनिधी )२१ जून २०२३ रोजी जगभरात योगदिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावे म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावबहाद्दूर गट(बिजवडी) येथे योग दिन विविध योगासने, प्राणायाम करून साजरा केला गेला.
*शाळेचे मुख्याध्यापक श्री. श्रीकांत राऊत सरांनी विद्यार्थ्यांना व्यायामाचे, योगासनाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर विविध शारीरिक हालचाली, व्यायाम प्रकार ,विविध प्रकारची योगासने, सूर्यनमस्कार घेण्यात आले. प्रत्येक योगासनाचे फायदे योगासने सुरू असताना श्री. अजमीर फकीर सरांनी विद्यार्थ्यांना सांगितले. शेवटी प्राणायाम घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. आजच्या योग दिनाच्या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका सारिका चव्हाण, गिरीजा गेजगे यांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.*







