मंगळवेढा /प्रतिनिधी भैय्या खिलारे :रयत शिक्षण संस्थेच्या सिद्धेश्वर प्रशाला त शेटफळ या शाखेमध्ये 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी योगशिक्षक घोरपडे सर प्रशालेची क्रीडा शिक्षक पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना योगाभ्यास प्राणायाम ध्यान याविषयी माहिती दिली .तसेच योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले . विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे योगासने आणि योग प्राणायाम केला . प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जयसिंगराव माने यांनी योगाचे आपल्या जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले . प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या योग शिबिरात सहभाग घेऊन योगासने केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौदागर सर, बारले सर ,धंगेकर सर ,कांबळे सर ,गोरे सर यांनी परिश्रम घेतले






