योगासने म्हणजे निरोगी जिवनाची गुरूकिल्ली – माने देशमुख
अकलूज- योगासने ही मन आणि शरीर बलवान ठेवण्यासाठी उपयुक्त असल्याचे आपल्या वेदांमध्ये लिहून ठेवलेले आहे. आपल्या पुर्वजांना शरीर शास्त्राविषयी त्या काळात एवढी खोलवर माहिती होती. याच योगाचा आज जगामध्ये प्रसार झालेला आहे. आरोग्यम धनसंपदा हे केवळ सुभाषित नसुन निरोगी जिवन जगण्याची गुरूकिल्ली असल्याचे मत योगशिक्षक यशवंतराव माने देशमुख यांनी व्यक्त केले..जिजामाता कन्या प्रशाला अकलूज येथे आज योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थीनींनी योगासने करून आजची नवी पिढीही आरोग्याबाबत जागृत असल्याचे दाखवून दिले. यावेळी १ हजार ३०४ विद्यार्थीनी व ३८ शिक्षक शिक्षीकांनी योगाची प्रात्यक्षिके केली.योगशिक्षक माने देशमुख म्हणाले, संयुक्त राष्ट्र संघातील सुमारे १९५ देशांपैकी १७५ देशांनी योगाला पाठींबा दिला आहे. योग हेच खरे शरीर आणि मन सशक्त व सक्षम ठेवण्याचे साधन असल्याचे आज सगळ्या जगाला पटले आहे.आज जागतिक संगित दिन ही आहे. योग प्रात्यक्षिकानंतर जिजामाता कन्या प्रशालेच्या विद्यार्थीनींनी विविध गितांचे सादरीकरण करून जागतिक संगित दिन साजरा केला. संगित शिक्षक ज्ञानेश्वर शेलार यांनी संगित दिनाबद्दल सर्व विद्यार्थिनींना माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापिका सुनिता वाघ यांनी सर्वांना जागतिक योग व संगित दिनाच्या शुभेच्छा दिल्या.








