डॉ.अंजुम जमादार यांच्या डॉ.अंजुम्स होमिओपॅथिक क्लिनिकचा हडपसर, पुणे येथे डॉ.अरूण भस्मे यांचे हस्ते संपन्न उद्घाटन समारंभ संपन्न …
दि.7 मे 2023 रोजी गंधर्व गॅलक्सी,मगरपट्टा सिटी, हडपसर पुणे येथे डॉ.अंजुम जमादार कुरेशी यांच्या डॉ.अंजुम्स होमिओपॅथिक क्लिनिकचा उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक सल्लागार समितीचे अध्यक्ष होमिओपॅथीचे नेते डॉ.अरुण भस्मे यांच्या शुभहस्ते व प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ जगातील पहिले होमिओपॅथिक पीएचडी डॉ.हरी तु.घोलप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले होमिओपॅथि शास्त्र हे सध्या काळाची गरज असून बाकीच्या उपचार पद्धतीमध्ये रुग्णांमध्ये साईड इफेक्टचे प्रमाण जास्त असून कोणत्याही दुष्परिणामानाशिवाय काम करणारे एकमेव शास्त्र म्हणून होमिओपॅथीकडे पाहिले जाते त्यामुळे सर्वांनी होमिओपॅथिक शास्त्राचा अवलंब करत सर्व सामान्य रुग्णांपर्यंत होमिओपॅथी पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक सल्लागार समितीचे अध्यक्ष होमिओपॅथीचे नेते डॉ.अरुण भस्मे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष जगातील पहिले होमिओपॅथिक पीएचडी प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉ.हरी तु.घोलप यांनी होमिओपॅथीमुळे अति दुर्धर आजार सुद्धा सहजरीत्या बरे होतात फक्त त्यासाठी शास्त्रशुद्ध उपचाराची गरज असल्याचे सांगत होमिओपॅथिचे जनक डॉ.सॅम्युअल हनीमन यांच्या सिद्धांतानुसार जर डॉक्टरांनी वैद्यकीय व्यवसाय केला तर यश हे निश्चितच असून त्यांनी स्वतः बऱ्या केलेल्या व अतिदुर्गर आजारांवर होमिओपॅथिक उपचार केलेल्या केसेस सांगून, सर्वांनी होमिओपॅथीचाच वापर करावा असे सांगितले. यावेळी सोनाजीराव क्षिरसागर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या प्रा. सौ. मीना भस्मे, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासकीय सदस्य डॉ.बाळकृष्ण गायकवाड,महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे सदस्य डॉ. बाळासाहेब हरपळे, पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.अजय तायडे, नोबेल हॉस्पीटल, हडपसरचे संचालक डॉ. सुरेश शिखरे, बेटी बचाव जनआंदोलनचे प्रणेते डॉ. गणेश राख, होमिओपॅथी तज्ञ क्रिकेटपटू डॉ. निरंजन रेवडकर, होमिओपॅथी साठी ब्लडबँक सुरु करणारे एकमेव डॉक्टर श्रीरामपूरचे अॅड. डॉ.आर.एस.जोंधळे,डॉ. हुसेन,श्री आजम शेख,माजी सहायक पोलिस आयुक्त कासम जमादार, श्रीमती मालन दिलावर शेख, उद्योजक संभाजी इंदलकर, अजित सुरवसे, गंधर्व गॅलक्सी परिसरातील व्यावसायिक व जमादार परिवारावर प्रेम करणारी मंडळी यावेळी उपस्थित होती. प्रारंभी सर्वांचे स्वागत डॉ.अंजुम जमादार व सलिम जमादार यांनी केले..

















