*राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिसरातील पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला.*
संग्रामनगर दि.७ (केदार लोहकरे यांजकडून)
अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून दर वर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.त्यामध्ये महाविद्यालय परिसरामध्ये विविध वृक्षांची लागवड करण्यात आले आहे.त्यातील अनेक वेगवेगळी झाडं महाविद्यालय परिसरांमध्ये लावण्यात आले आहेत.या झाडांची राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून काळजी घेतली जाते.झाडाच्या संवर्धनाकडे विशेष लक्ष दिले जाते,त्याचे फलस्वरूप आज कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा महाविद्यालय परिसरातील हिरवीगार झाडे डोलत असताना दिसत आहेत.कडक उन्हामध्ये सावलीच्या आशेने अनेक पक्षी या झाडांवरती आश्रय घेत असतात. अनेक पक्षानी आपली घरटी या झाडांवरती बांधलेली आहेत.त्यामुळे पक्ष्यांच्या या किलबिलाटाने महाविद्यालय परिसर रंगून जात असतो,परंतु सध्याच्या भयंकर उन्हामुळे पक्षांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होत होता.त्यामुळेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांकडून झाडांच्या फांद्यांना वाट्या बांधण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दररोज पाणी ओतण्यात येते.त्यामुळे पक्षांना ते पाणी सहज पिता येते.राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.स्वयंसेवक सत्यजित चव्हाण,हितेश पुंज,विनायक मंडले,आकाश चव्हाण,विक्रम खंडागळे,यांनी या उपक्रमामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. या उपक्रमासाठी स्वयंसेवकांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे तसेच विभागीय समन्वयक डॉ.चंकेश्र्वर लोंढे,कार्यक्रम आधिकरी डॉ. दत्तात्रय मगर,डॉ.सविता सातपुते मॅडम,डॉ.सज्जन पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे










