25-04-2023रोजी संघर्ष योद्धा डिजिटल न्यूज मध्ये प्रकाशित झालेल्या घराच्या स्वप्नासाठी घेतलेल्या कर्जामुळे राहते घरी गेले तरीही काढलेल्या कर्जाच्या दुप्पट व्याज देणे बाकीच असल्याने आता आत्महत्या शिवाय पर्याय नाही संतोष माने.या बातमी संदर्भात शिवकृपा पतपेढी मुंबई यांचा खुलासा.
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील संग्रामनगर (कृष्णप्रिया नगर येथील रहिवाशी व शिवकृपा सहकारी पतपेढी शाखा माळशिरस चे कर्जदार संतोष नामदेव माने यांनी दिलेल्या माहितीच्या व पुराव्या च्या आधारे 25-04-2023रोजी संघर्ष योद्धा डिजिटल न्यूज मध्ये *घराच्या स्वप्नासाठी घेतलेल्या कर्जामुळे राहते घरी गेले तरीही काढलेल्या कर्जाच्या दुप्पट व्याज देणे बाकीच असल्याने आता आत्महत्या शिवाय पर्याय नाही संतोष माने.*अशा मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आली होती.
दरम्यान ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर संस्थेची बदनामी झाल्याची भावना झाल्यानंतर शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई. सोलापूर विभागीय कार्यालय यांनी 26-04-2023 रोजी या बातमीचा खुलासा करण्यासाठी संघर्ष योद्धा कडे नोटीस पाठविली आहे.
या अनुषंगाने सदर खुलासा प्रकाशित करीत आहे.
*शिवकृपा सहकारी पतपेढी लि., मुंबईसोलापूर विभागीय कार्यालय.*कार्यालय पत्ता :- नामदेव स्मृती शिंगाडे बिल्डींग, म्हसवड रोड, माळशिरस ता. माळशिस जि. सोलापूर:(02185) 235463जावक क्र. – सोलापूर विभाग/ वसुली/03/2023-24दिनांक : 26/04/2023
प्रति,मा. संपादक सो दै. संघर्ष योध्दा अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर
विषय :- संस्थेच्या माळशिरस शाखेचे कर्जदार श्री संतोष नामदेव माने यांनी वर्तमान पत्रामध्ये दिलेल्या बातमीचा खुलासा प्रसिध्द करणेबाबत
महोदय.
शिवकपा सहकारी पतपेढी लि. मुंबई शाखा माळशिरस येथिल कर्जदार संतोष नामदेव माने व सौ. सरस्वती संतोष माने यांचेबाबत आपले डिजीटल वर्तमान पत्र संघर्ष योध्दा यामध्ये दि. 25/04/2023 रोजी संस्थेविरुध्द बदनामीकारक बातमी प्रसिध्द केली आहे. यामध्ये संस्थेने केलेली कर्ज वसूलीची कारवाई व व्याज आकारणी बाबत अक्षेप घेतले आहेत.
याबाबतचा वस्तूस्थिती दर्शक खुलासा खालील प्रमाणे सादर करीत आहे. त्याची नोंद घ्यावी.कर्जदार श्री संतोष नामदेव माने व सौ सरस्वती संतोष माने यांनी आमचे संस्थेतून गृहतारण व स्थावर तारण कर्ज असे एकूण रु. 32,84,000/- कर्ज घेतले आहे. सदर कर्जाची एकूण येणे रककम रु. 54,78,192/- इतकी आहे. या पैकी एका कर्जाची मुदत संपली असून दोन्ही कर्जाची थकबाकी रु. 52,98,117 /- इतकी आहे. वरील दोन्ही कर्जावर व्याजाची आकारणी हि कर्ज मंजूरी पत्रावर नमूद व्याज दराप्रमाणे होत आहे. वरील दोन्ही कर्जाचे हप्ते कर्जदार यांनी वेळेत भरणा न केल्याने कर्जाची थकबाकी होवून दोन्ही कर्ज खाती थकीत होवून एन पी ए झाली आहेत.
त्यामुळे संस्थेने दोन्ही कर्ज खात्यावर नाईलाजास्तव महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये दावे दाखल करुन वसूली दाखले प्राप्त केले आहेत. त्यानुसार कर्ज वसूलीची कायदेशीर कारवाई सुरु आहे. कर्जदार यांची संस्थेकडे तारण असणारी स्थावर मालमत्ता हि संस्थेची पूर्व परवानगी न घेता परस्पर त्रयस्थ इसमास विक्री केली आहे. याबाबत संस्थेने माळशिरस पोलिस स्टेशन यांचेकडे एफ. आय आर नोंद केला असून सदरचा फौजदारी दावा में, न्यायाधिश दिवाणी व फौजदारी न्यायालय, माळशिरस येथे सुरु आहे.
अशाप्रकारे कर्जदार यांनी तारण असलेली मिळकत परस्पर विक्री करुन संस्थेची देखील फसवणूक केली आहे.विशेष वसूली अधिकारी यांनी तारण दिलेल्या स्थावर मालमत्तेचा ताबा मे. जिल्हाधिकारी सो सोलापूर यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी मंडल अधिकारी अकलूज यांचेमार्फत रीतसर घेतला आहे. कर्जदार यांचा व्यवसाय सुरु असून सुध्दा ते स्वतः कोणतीही रक्कम कर्ज खाती भरणा करीत नाहीत. कर्जदार यांना कर्जरुपाने दिलेली रक्कम हि संस्थेच्या सर्व सामान्य सभासद ठेवीदारांनी गुंतवणूक केलेली रक्कम आहे. ती त्यांना मागताक्षणी व्याजासह परत करणे हि संस्थेची जबाबदारी आहे. कर्जदार यांच्या कर्ज खात्यावर केलेली व्याजाची आकारणी हि कर्ज मंजूरी पत्राप्रमाणे केली.आहे. जी कर्जदार यांना कर्ज घेताना मान्य होती. कर्जदार यांनी व्याजाची आकारणी पठाणी आहे असा उल्लेख केलेला आहे. जर व्याजाची आकरणी व कर्ज वसूलीची कारवाई चुकीची असेल तर त्यांनी योग्य न्याय प्राधिकारणाकडे दाद मागणे आवश्यक असताना कर्जदार नाहक अशा बातम्या देवून संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत..
कर्जदार यांनी यापूर्वी दोन्ही कर्जाची रक्कम एकरकमी भरण्याच्या अनुषंगाने कर्ज रक्कमेत सवलत मिळणेसाठी वेळोवेळी अर्ज दिले आहेत. कर्जदार यांनी दिलेल्या अर्जावर विचार करुन मा. संचालक मंडळाने त्यांना सवलत देवून भरावयाची कर्ज रक्कम ठरवून दिलेली आहे व कर्ज रक्कम भरण्यास पुरेसा कालावधीही देण्यात आला होता. तरीही कर्जदार यांनी कर्ज रक्कम भरणा केली नाही.
त्यानंतर कर्जदार यांनी माळशिरस येथे मा. पदाधिकारी व संचालक यांची प्रत्यक्ष भेट घेवून कर्ज रक्कम भरण्याबाबत चर्चा केली आहे. यावरुन संस्थेने कर्जदार यांना वेळोवेळी रक्कम भरण्याबाबत संधी, सवलती व कालावधी दिला होता व आहे.कर्जदार यांनी तारण दिलेल्या स्थावर मालमत्तेचे लिलाव करुनही त्यास खरेदीदार उपलब्द झाले नसलेने लिलाव प्रकीया पूर्ण होवून कर्ज रक्कम वसूल झाली नाही. तारण मिळकतीमध्ये वाद निर्माण करुन कर्जाची वसूली होवू नये व सदरचे कर्ज बुडावे.अशी कर्जदार यांची मानसिकता आहे. तारण मिळकतीत वाद निर्माण केलेने जामीनदार यांच्या मालमत्तेवर जप्ती आदेश नोंद करणे भाग पडले आहे. कर्जदार यांनी अशाप्रकारच्या बातम्या न देता कर्ज रक्कम भरणा करुन कर्जमुक्त व्हावे जेणेकरुन कर्जवसूलीची पुढील कारवाई थांबेल.
वरील प्रमाणे आपण दि. 25/04/2023 रोजी दिलेल्या बातमीबाबतचा खुलासा संस्थेच्या वतीने आपले वर्तमान पत्रात प्रसिध्द करावा हि विनंती.
विभा. कर्ज वसुली अधिकारी,विभागीय अधिकारी.शिवकृपा सहकारी पतपेढी लि., मुंबई.सोलापूर विभाग.
चौकट :-
माळशिरस शाखेचे कर्जदार संतोष नामदेव माने यांनी दिलेल्या माहिती च्या आधारे 25-04-2023रोजी सदर बातमी संघर्ष योद्धा डिजिटल न्यूज मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. सदर बातमी प्रकाशित करताना संस्थेची बदनामी करण्याचा कोणताही हेतू नव्हता.यासंदर्भात संस्थेने बातमी बाबत खुलासा करण्यासाठी दिलेल्या पत्राच्या आधारे सदर खुलासा प्रकाशित केला आहे.
गणेश लक्ष्मण जाधव.संपादक.संघर्ष योद्धा, डिजिटल न्यूज.अकलूज.







