माळशिरस तालुक्यातील संगम मध्ये साडे सोळा लाखांची जबरी चोरी
अकलूज-(प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील संगम येथील शंकर दत्तु ताटे देशमुख यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने असा सुमारे १६ लाख ५७ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवार दि. ७ मे २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ च्या दरम्यान घडली आहे.याबाबत ताटे देशमुख यांनी अकलूज पोलीसांत अज्ञात चोरट्या विरूध्द फिर्याद दाखल केली आहे.याबाबत अज्ञात चोरट्या विरोधात अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३४० / 2023 व भारतीय दंड विधान कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अकलूज पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. ७ मे रोजी ताटे देशमुख यांचे घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून ५२ हजार रूपये किंमतीच्या लहान मुलांच्या १३ सोन्याच्या अंगठ्या, ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे लॉकेट, ५ लाख ६० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे गंठण व साखळी, १ लाख ८८ हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या पाटल्या, ३६ हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी, ४० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे ब्रासलेट, ७६ हजार रूपये किंमतीचा सोन्याचा लक्ष्मीहार, ३६ हजार रूपये किंमतीची सोन्याची बोरमाळ, १६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे पेंडंट, ३६ हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या, ३ लाख ८० हजार रूपये किंमतीचे राणीहार, ३५ हजार रूपये किंमतीचे चांदिचे ताट, १२ हजार रूपये किंमतीची सोन्याची नथ व १ लाख ५० हजार रूपये रोख रक्कम चोरून नेली आहे.सदर चोरीच्या ठिकाणी पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे,पोलीस निरिक्षक दीपरतन गायकवाड, यांनी स्वतः भेट दिली. श्वानाच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला व हातांचे ठसेही घेण्यात आले. चोरट्यांच्या तपासासाठी पोलीसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक दीपरतन गायकवाड हे करत आहेत.






