*अंतिम टप्यात आलेले सर्किट बेंचचे काम निर्णायक होणेसाठी प्रयत्न करणार* *नुतन अध्यक्ष ॲड प्रशांत देसाई*
कोल्हापूर दि.४ (केदार लोहकरे यांजकडून)
कोल्हापूर जिल्हा बार असोची वार्षिक निवडणूक सण २०२३- २०२४ करीता पार पडलीत्यामध्ये अँड प्रशांत देसाई यांची अध्यक्षपदी व इतर कार्यकारणी यांची पदाधिकारी म्हणून निवड झाले बद्दल आज जिल्हा बार असो वतीने सत्कार समारंभ व पदग्रहण कार्यक्रम जिल्हा बार असो न्यायसंकुल मध्ये पार पडला.सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ॲड.विजयकुमार ताटे-देशमुख यांनी केले. सहा जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा अंतिम टप्यात असलेला सर्किट बेंच स्थापनेचा प्रश्न निर्णायक होणेसाठी प्रयत्न करणार असे प्रतिपादन नुतन अध्यक्ष ॲड.प्रशांत देसाई यांनी केले.तसेच वकिल सभासद सार्वभोम मानून कामकाज केले जाईल अशी ग्वाही दिली. सदर कार्यक्रमात नुतन अध्यक्ष ॲड.प्रशांत देसाई,उपाध्यक्ष ॲड.विजयसिंह पाटील,सचिव ॲड.तेजगोंड पाटील,सहसचिव ॲड.जगजित अडनाईक,लोकल ऑडिटर ॲड.नवतेज देसाई,महिला प्रतिनिधी ॲड.अश्विनी भोसले, कार्यकारणी सदस्य ॲड. ऋषिकेश काकडे,ॲड.बेनझीर जमादार,ॲड.विनायक गोरे,ॲड. सौरभ सरनाईक,ॲड.विशाल धनवडे,ॲड.अनिसा शेख,ॲड.कुणाल नलवडे,ॲड.विद्या निकम,ॲड.ओंकार पाटील यांचा बार असो मार्फत पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ॲड.शिवराम जोशी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून चांगले काम केले बद्दल त्यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बार कौन्सिल महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ॲड. विवेक घाटगे,मावळते अध्यक्ष ॲड.गिरीश खडके,माजी अध्यक्ष ॲड.शिवराम जोशी,ॲड.अजित मोहिते,ॲड.प्रशांत चिटणीस, ॲड.अशोक पाटील,ॲड.संपतराव पवार,ॲड. प्रकाश मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,सर्व नुतन पदाधिकारी यांना शुभेच्छा देऊन,त्यांचा कार्य काळात चांगले कार्य व्हावे,तसेच अंतिम टप्यातील सर्किट बेंच प्रश्न मार्गी लागावा अशी सदिच्छा व्यक्त केली.तसेच मागील कार्यकारिणीने केलेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी नुतन सचिव ॲड. तेजगोंड पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,सभासदांनी दाखवले विश्वासास पात्र राहून काम केले जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी जिल्हा सरकारी वकील ॲड.विवेक शुक्ल,ॲड. सुधीर चव्हाण,ॲड.संदीप चौगुले,ॲड.संकेत सावर्डेकर,ॲड.तृप्ती नलवडे,ॲड.शिवाजीराव राणे,ॲड.सतिश खोतलांडे,ॲड.सुभाष पिसाळ वकील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन ॲड.सुधीर चव्हाण यांनी केले.







