बांधकाम व्यावसायिक ला खोटा गुन्हा दाखल करण्याची तसेच जिवे मारण्याची धमकी देवुन फिर्यादी कडून एक लाख रूपयांची खंडणी वसुल केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाणेत गुन्हा दाखल.आरोपीना अटक. न्यायालयीन कोठडी
इंदापूर (प्रतिनिधी )
विश्वनाथ ज्ञानदेव रूपनवर( वय ३४ वर्षे) व्यवसाय बांधकाम व्यवसाय रा.चाकाटी ता. इंदापुर जि.पुणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी१) राहुल व्यंकट आरडे २) स्वाती राहुल आरडे दोन्ही रा. हिंगणगाव ता. इंदापुर जि. पुणे यांचे विरुद्ध इंदापुर पोलीस ठाणे येथे गु.र.नं.४६७/२०२३ भादंवि कलम३८४,३८५,३८६,५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला असून, आरोपी ला 28एप्रिल रोजी अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता. त्यांचा जामीन फेटाळून न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती वरून सन २०२२ ते दिनांक २६/०४/२०२३ रोजी पर्यंत मौजे इंदापुर ता. इंदापुर जि.पुणे गावचे हददीतगुन्हा घडला असून २७/०४/२०२३ रोजी १२/२० वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, यातील आरोपी १ व २ यांनी यातील फिर्यादीला शासनाकडुन मिळालेल्या बांधकाम कामातील 5 टक्के रक्कम खंडणी स्वरूपात मागितली.खंडणी रक्कम दिली नाही तर त्यांनी फिर्यादीवर अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतबिंधक कायदा तसेच विनयभंग / बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची तसेच जिवे मारण्याची धमकी देवुन फिर्यादी कडून १,०५,०००/- रूपयांची खंडणी वसुल केली आहे.अशा मजकुराचे फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टरी दाखल करून पुढील तपास इंदापूर चे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शन खाली सपोनि पवार हे करीत आहेत.







