पुणे जिल्ह्यातील इंदापूर पंचायत समिती च्या बांधकाम उपविभाग अंतर्गत झालेल्या कामात करोडो रुपये चा भ्रष्टाचार.उप अभियंता शिवकुमार कुपल यांनी केलेल्या भ्रष्टाचारची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.
इंदापूर (प्रतिनिधी ): पुणे जिल्ह्यातील इंदापूर पंचायत समिती च्या बांधकाम उपविभाग अंतर्गत 2021पासून बांधकाम उपविभागाकडून करण्यात आलेल्या रस्ता दुरुस्ती, खड्ड्यांंची डागडुजीसह इतर अनेक कामात करोडो रुपये चा भ्रष्टाचार झाला असून, सर्व कामाची चौकशी करून भ्रष्टाचार करणार्या उप अभियंता शिवकुमार कुपल यांच्या सह ठेकेदार यांचेवर देखील कारवाई व्हावी. अशी मागणी जोर धरू लागली आहे. इंदापूर तालुक्यातील अनेक रस्त्यांचे खड्डे बुजविण्याचे काम गेल्या काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली खड्डे बुजविताना .कमी डांबराचा वापर करीत अधिकार्यांनी मार्गांवरील खड्डे बुजवितांना उर्वरीत डांबराची परंस्पर विक्री करुन विल्हेवाट लावली असल्याचे देखील बोलले जात आहे. अधिकार्यांनी ठेकेदारांच्या नावाखाली संगनमताने अनेक बिले प्रत्यक्षात कामे न करताच काढून शासकिय निधीचा भ्रष्टाचार केला.अनेक कामात शासकिय निधीची अफरातफर झाली आहे.मंजूर झालेल्या अनेक कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. ज्या ठेकेदारांशी साटे लोटे आहे अशांच्या संगनमताने त्यांच्या नावावर कामे देउन बीले काढणे व सर्वसामान्य ठेकेदारांना बीलासाठी वेठीस धरणे, अडवणूक करणे आदी प्रकार होत आहेत. या सर्व प्रकाराची त्वरीत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. अशी मागणी होत आहे.इंदापूर तालुक्यातील अनेक निकृष्ट दर्जाची कामे असतानाही ठेकेदारांनी बिले देणे, एकाच कामाचे दोन दोन प्रस्ताव तयार करणे अशा प्रकारे भ्रष्टाचाराचे पेवच फुटलं असून, अनेक कामात करोडो रुपये चा भ्रष्टाचार झाला आहे.उप अभियंता शिवकुमार कुपल यांनी आजपर्यंत गोरगरीब जनतेसाठी असलेला शासनाचा किती करोडो रुपयांचा निधी ठेकेदार सोबत संगनमताने स्वताचया घशात घातला आहे.यापूर्वी कुपल हे माळशिरस पंचायत समिती मध्ये कार्यरत असताना देखील त्यांनी अनेक कामात भ्रष्टाचार केला आहे.येथील सामाजिक संघटनानी त्या संदर्भात अनेकवेळा आंदोलन देखील केले होते. त्यानंतर त्यांची इंदापूर येथे 2021मध्ये बदली करण्यात आली. परंतु आता इंदापूर येथे देखील त्यांनी अनेक कामात भ्रष्टाचार करून शासनाच्या निधीचा दुरुपयोग केला असून. स्वतः मात्र मोठी मिळकत कमविली आहे.एव्हढेच नव्हे तर आपल्या विभागात झालेल्या भ्रष्टाचार ची कोणीहो वाच्यता करू नये म्हणून प्रत्येक वर्षी मार्च एन्ड आणि दीपावली मध्ये अनेकांना सप्रेम भेट म्हणून पाकीट दिले जाते.इंदापूर पंचायत समिती च्या बांधकाम विभाग अंतर्गत 2021पासून करण्यात आलेल्या सर्व कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. अशी मागणी जोर धरू लागली आहे.यासंदर्भात उप अभियंता कुपल यांना मोबाईल वरून संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही.
इंदापूर पंचायत समिती च्या बांधकाम उपविभाग अंतर्गत इतर कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचे निदर्शनास आल्यास निसंकोचपणे 7841847458. या नंबर वर संपर्क साधावा.क्रमशः भाग -1.







