• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home संपादकीय

हजारो रुग्णांना मृत्युच्या दाढेतून वाचवीणारे डॉ. एम. के. इनामदार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
April 10, 2026
in संपादकीय
0
हजारो रुग्णांना मृत्युच्या दाढेतून वाचवीणारे डॉ. एम. के. इनामदार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
0
SHARES
353
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हजारो रुग्णांना मृत्युच्या दाढेतून वाचवीणारे डॉ. एम. के. इनामदार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अकलूज(गणेश जाधव),

अकलूज येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर एम. के. इनामदार यांचा आज 10एप्रिल 2026 रोजी वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.गेल्या 45 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून तसेच सांगली, सातारा, सोलापूर, पुणे अशाअनेक जिल्ह्यातील पीडित रुग्णांवर यशस्वी पणे उपचार करून त्यांची अविरत पणे सेवा करून आज पर्यंत हजारो रुग्णांना त्यांनी जीवनदान दिले आहे.अकलूज मध्ये अश्विनी हॉस्पिटल च्या माध्यमातून गेली चार दशकं (45वर्ष) विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या लोकांवर ईलाज केला जातोय. सुरवातीला अकलूज मधील लोकं नंतर तालुक्यातील , काही वर्षांनी सोलापुर, नंतर राज्यातील व आज परराज्यातील लोकं सुद्धा येथे उपचारासाठी येत आहेत. अश्विनी हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉ.एम.के.इनामदार हे खऱ्या अर्थाने माणसातील देवमाणूस आहेत. असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. अश्विनी हॉस्पिटल च्या माध्यमातुन गेली 41वर्ष अविरत, असंख्य रुग्णांची सेवा करीत असलेला हा देवमाणुस.खरतरं अकलूज हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखल जात आणि त्याच बरोबर आज अकलूज हे उत्तम वैद्यकीय सेवेसाठी सुद्धा ओळखल जातंय. शहरी भागांतून ते ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांवर अकलूजचे इनामदार डॉक्टर आणि त्यांचा दवाखाना अश्विनी हॉस्पिटल प्रसिद्ध आहे. इनामदार डॉक्टरांच्या अत्यंत प्रेमळ, शांत, हुशार, संयमी स्वभावामुळे इथं येणारा रुग्ण समाधानी होऊनच माघारी जातो. 1980 साली छोट्याश्या जागेत स्थापन झालेलं हे अश्विनी हॉस्पिटल आज 24 तास अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणार आरोग्य केंद्र बनलं आहे. 75 बेड्स, ICU, CCU unit, अत्याधुनिक लॅब्स नी सुसज्ज असं हे अश्विनी हॉस्पीटल वैद्यकीय सेवेच केंद्रबिंदू बनलं आहे.इनामदार डॉक्टरांबरोबर डॉक्टरांची टीम, नर्सिंग स्टाफ, इतर कामगार सुद्धा पेशंट ची आस्थेने, मायेने, आपुलकीने विचारपूस करून उत्तम सेवा देण्याचं काम करीत आहेत. इनामदार डॉक्टरांच्या प्रेमळ स्वभावामुळं स्टाफ गेली 35वर्षकाम करीत आहेत. अश्विनी हॉस्पिटलमध्ये चांगली प्रॅक्टिस करून आज बऱ्याच डॉक्टरांनी त्यांची स्वतःची प्रॅक्टिस चालु केली आहे. म्हणजे चांगले डॉक्टर घडविण्याचे काम सुद्धा या अश्विनी हॉस्पिटल च्या माध्यमातून इनामदार डॉक्टरांनी केलेलं आहे. आता डॉ.एम. के. इनामदार यांची दुसरी पिढी म्हणजे त्यांचे चिरंजीव डॉ.अनिकेत इनामदार सुद्धा एम.डी झालेले असुन ते सुद्धा उत्तम सेवा बजावत आहेत. अशाप्रकारे अतिशय चांगली वैद्यकीय सेवा देऊन कित्येक कुटुंबांच आयुष्य सुखकर करणारे , कित्येकांना मृत्युच्या दारातून परत आणणाऱ्या देव माणसाला डॉ.इनामदार सरांना व त्यांच्या अश्विनी हॉस्पिटला 41 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेसाठी शुभेच्छा . अकलूज येथील प्रसिध्द हृदयरोग तज्ञडॉ. मनोहर कालीदास इनामदार यांनी कार्डिओलॉजी बरोबरच मेडिसिन व सामाजिक क्षेत्रात भरीव काम केल्याने त्यांना अमेरिकेतील कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी सोसायटीची वैद्यकीय क्षेत्रातील जगात अत्यंत मानाची समजली जाणारी फेलोशीप दिली असून 12 मार्च 2018 रोजी हा पदवीदान समारंभ अमेरिकेतील ऑरलॅंडो येथे दिमाखात संपन्न झाला. एम. डी. (मेडिसीन) अशी वैद्यकशास्त्रातील पदवी असणाऱ्या डॉ. इनामदार यांनी अकलूज सारख्या ग्रामिण भागात अश्विनी हॉंस्पीटल सुरू केले. या रूग्णालयात त्यांनी मेंदू, आतडे, फुफुस व इतर जनरल प्राक्‍टीस करत असताना एक हृदयरोग तज्ञ म्हणून ख्याती मिळवली. डॉ. इनामदार यांनी आज अखेर 7 हजार 500 अँन्जीओग्राफी, 4 हजार 500इन्जीओप्लास्टी केल्या. त्यातील सुमारे 1 हजार 200 अँन्जीओप्लास्टी या प्रायमरी (गंभीर अवस्था) मधील केल्या आहेत. त्याचबरोबर 650 बायपास सर्जरी व सुमारे 150 पेसमेकर अशा शत्रक्रिया केल्या आहेत. असे एकुण 12 हजार कॅंथलॅंब प्रेसिनर केलेल्या आहेत. गत 15 वर्षापुर्वी डॉ. इनामदार यांनी कॅथॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर अकलूज येथे त्यांनी कॅथलॅब सुरू केली. आज डॉ. इनामदार हे हृदयशत्रक्रिया विशारद म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत. पुणे आणि मिरज हे अकलूजपासून 170 तर सोलापूर 120 कि. मी. अंतरावर आहे. पुर्वी हृदयरोगाच्या रूग्णाला गंभिर अवस्थेत या शहरांमध्ये न्यावे लागायचे. परंतु डॉ. इनामदार यांनी हृदयशस्त्रक्रिया सुरू केल्या पासून सोलापूर जिल्ह्यातील रूग्णांची मोठी सोय झाली आहे. डॉ. इनामदार म्हणतात मी आजही विद्यार्थी दशेत आहे हृदयाच्या बाबतीत दरवर्षी नवनविन तंत्रज्ञान तयार होत आहे मी दरवर्षी जगभरातील परिषदांना उपस्थित राहून हे तंत्रज्ञान शिकत असतो. हृदयशस्त्रक्रिये बरोबरच डॉ. इनामदार हे सर्वप्रकारच्या विषबाधा व सर्पदंश याच्या उपचारांमधील ही तज्ञ आहेत. डॉ. इनामदार यांचे वैद्यकिय क्षेत्रातील योगदान अतिशय मोठे आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्येही ते नेहमीच अग्रेसर असतात. ज्यांना मदतीची अत्यंत आवश्‍यकता आहे अशा लोकांसाठी डॉ. इनामदार यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी या सोसायटीने त्यांना फेलोशिप दिली आहे. कोरोना निर्मुलनाच्या कामात जीवाची बाजी लावून लढणारे घटक म्हणून वैद्यकीय क्षेत्र व पोलीस खात्यातील अधिकारी, कर्मचारी वर्गाने जनमानसात आदराचे स्थान मिळवले आहे. पण वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मनुष्यच नव्हे प्रत्येक सजीवाच्या जीवाची काळजी वाटते. त्यासाठी ते आपल्या व्यस्त कामातून वेळ काढतात. लौकीक अर्थाने अलौकिक काम करुन जातात. ही किमया डॉ. इनामदार यांनी करुन दाखवली आहे. सोलापूर व पुणे जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यात डॉ. इनामदार यांना त्यांच्या निर्णायक उपचार पद्धतीसाठी ओळखले जाते.डॉक्टराचे सामाजिक काम देखील मोठे आहे. इंदापूर तालुक्यात 6 हजार 105 हेक्टर वनपरिक्षेत्र आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीव आहेत. मुख्यत्वे चिंकारा जातीच्या हरणांचे अभयवन म्हणून या वनपरिक्षेत्राची राज्यात ओळख आहे. या सर्व प्राण्यांची तहान भागवण्याचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील फ्रेंड्स ऑफ नेचर क्लब करत आहे. लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी उपलब्ध नसल्याने टँकर मिळणे जिकिरीचे झाले होते. पाणी पुरवठा करण्यासाठी यातायात करावी लागत होती. त्यामुळे ‘क्लब’ने पुरवठ्याबाबत लोकांना आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत डॉ. इनामदार यांनी पाणी पुरवठा करुन वन्यजीवांना दिलासा दिला आहे. त्यामुळे कोरोनाच्या महाभयंकर संकटात व लॉकडाउन काळात डॉक्टरची वन्यजीवांना केलेल्या या मदतीमुळे नक्कीच प्राण्यांची तहान भागणार आहे. वैद्यकीय सेवा करीत असतानाच सामाजिक कार्यात देखील त्यांचा नेहमीच सहभाग असतो.तसेच 2021मध्ये अकलूज येथील एका गरीब मुलीला डोळ्यांचा गंभीर आजार होता. तेव्हा देखील डॉक्टर इनामदार यांनी त्या मुलीला 35 हजार रुपये किमतीचे इंजेक्शन स्वतः देऊन तिला नवीन दृष्टी दिली.तसेच प्रत्येक वर्षी माळशिरस तालुक्यातील पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी देखील करतात.

आज 10एप्रिल 2026 माणसातील देवमाणूस डॉक्टर एम. के. इनामदार यांचा वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या हृदयापासून हृदयापर्यंत हार्दिक शुभेच्छा.

गणेश लक्ष्मण जाधव.पत्रकार अकलूज.7841847458.

Related Posts

विजयसिंह मोहिते-पाटील स्कूल अँड कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या बी.एस्सी. (नर्सिंग), जीएनएम व एएनएम  विभागातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या शपथग्रहण व दीपप्रज्वलन समारंभ (लॅम्प लाइटिंग सोहळा) संपन्न
Uncategorized

विजयसिंह मोहिते-पाटील स्कूल अँड कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या बी.एस्सी. (नर्सिंग), जीएनएम व एएनएम विभागातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या शपथग्रहण व दीपप्रज्वलन समारंभ (लॅम्प लाइटिंग सोहळा) संपन्न

June 15, 2023
राज्यातील विनाअनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालयांच्या शंभर टक्के अनुदानासाठीच्या आंदोलनकडे तीन आठवडे उलटल्यानंतर ही राज्य शासनाचे दुर्लक्ष.*  शिक्षक घडविणाऱ्या शिक्षकांच्या वरील अन्यायामुळे शिक्षण क्षेत्रात संतप्त प्रतिक्रिया
शैक्षणिक

राज्यातील विनाअनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालयांच्या शंभर टक्के अनुदानासाठीच्या आंदोलनकडे तीन आठवडे उलटल्यानंतर ही राज्य शासनाचे दुर्लक्ष.* शिक्षक घडविणाऱ्या शिक्षकांच्या वरील अन्यायामुळे शिक्षण क्षेत्रात संतप्त प्रतिक्रिया

March 13, 2023
व्यवसायाला समाजकार्यांची जोड देणारा अवलिया कमलेश (शेठ )वसंतदास शहा.
संपादकीय

व्यवसायाला समाजकार्यांची जोड देणारा अवलिया कमलेश (शेठ )वसंतदास शहा.

March 1, 2026
उद्योग शिलता आणि सामाजिक बांधिलकीचा नव आदर्श जोपासणारे पुरोगामी डॉ दाम्पत्य डॉ कुमार लोंढे व डॉ सौ पंचशीला कुमार लोंढे
संपादकीय

उद्योग शिलता आणि सामाजिक बांधिलकीचा नव आदर्श जोपासणारे पुरोगामी डॉ दाम्पत्य डॉ कुमार लोंढे व डॉ सौ पंचशीला कुमार लोंढे

February 12, 2023
Next Post
गणपती बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांची औषध निर्माण कंपनीला भेट.*

गणपती बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांची औषध निर्माण कंपनीला भेट.*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!