• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home संपादकीय

व्यवसायाला समाजकार्यांची जोड देणारा अवलिया कमलेश (शेठ )वसंतदास शहा.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
March 1, 2026
in संपादकीय
0
व्यवसायाला समाजकार्यांची जोड देणारा अवलिया कमलेश (शेठ )वसंतदास शहा.
0
SHARES
186
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

व्यवसायाला समाजकार्यांची जोड देणारा अवलिया कमलेश (शेठ )वसंतदास शहा.

अकलूज (प्रतिनिधी )पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा येथील अतिशय गरीब कुटूंबात 1मार्च 1974साली जन्म झालेल्या कमलेश वसंतदास शहा यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जात आपला लहान भाऊ निलेश शहा यांच्या मदतीने मोठया जिद्दीने आणि कष्टाने अगदी अल्पअवधीतच आपला व्यवसाय वाढविला असून, आज ते अकलूज आणि परिसरात एक प्रतिष्टीत व्यापारी म्हणून ओळखले जात आहेत.वडील सुरवातीला बावडा येथे काही वर्ष यशवंत विविध कार्यकारी सोसायटी चे संचालक होते. तेव्हापासूनच ते वडिलांचा बारकाईने अभ्यास करीत होते.बावडा येथून अकलूज ला आल्यानंतर सुरवातीला नोकरी करणाऱ्या कमलेश यांनी साधारणपणे वीस वर्षांपूर्वी वडील वसंतदास माणिकदास शहा, आई मंगल शहा, लहान भाऊ निलेश शहा, तर बहीण नमिता शहा यांच्या सहकार्याने भाड्याने गाळा घेऊन शहा एंटरप्रायझेस या नावाने सिंगल युज प्लास्टिक पिशवी, युज अँड थ्रो च्या वस्तू विक्रीच्या आपल्या व्यवसायाला सुरुवात केली.सुरवातीला व्यवसाय अल्प चालत होता. मात्र निसर्गताच हसरा चेहरा, गोड बोलणे ग्राहकांना आकर्षित करण्याची हातोटी यामुळे कालांतराने व्यवसाय वाढला. सुरवातीला केवळ रिटेल व्यवसाय सुरु केला. काही वर्षानंतर ग्राहकांचा प्रतिसाद वाढल्याने नंतर होलसेल व्यवसाय सुरु केला.हा व्यवसाय वाढविण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील आणि अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची देखील मोलाची साथ मिळाल्याचे ते आवर्जून सांगतात. तसेच व्यवसाय वाढविण्यासाठी मेहुणे प्रसन्न शहा यांनी देखील वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचे ते सांगतात.आपला व्यवसाय सांभाळून ते आपल्या भावाच्या मदतीने शेती देखील करतात. प्रगतशील बागायतदार म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.दरम्यान अकलूज ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपरिषद मध्ये झाल्यानंतर अकलूज चे कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी यांनी माझी वसुंधरा अंतर्गत अकलूज स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्लास्टिक विक्री करू नये. असे सांगितल्यानंतर सर्वप्रथम कमलेश शहा यांनी प्लास्टिक पिशवी विक्री बंद करून प्लास्टिक टाळा, कागदी पिशवी वापरा असा संदेश देत प्लास्टिक विक्री बंद केली. एवढेच नव्हे तर काही नागरिकांना अडचणी येत आहेत. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी 81मायक्रोन ची प्लास्टिक पिशवी देखील उपलब्ध केली. आणि शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन केले.आपला व्यवसाय करीत असतानाच त्यांनी समाजकार्यात देखील स्वतःला झोकून दिले आहे. गोरगरीब लोकांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या मदतीला धावून जाऊन ते आपल्या परीने त्यालाआवश्यक ती सर्व मदत करतात.एवढेच नव्हे तर ते अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज यांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांनी आपल्या स्वामी समर्थ भक्त असलेल्या मित्रांसमवेत स्वामीसमर्थ ग्रुप देखील केला आहे. या ग्रुप च्या माध्यमातून वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. गोरगरीब लोकांना मदत करणे, वृक्षारोपण,अन्नदान करणे. गरजू लोकांना उपचारासाठी मदत करणे. असे वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.तसेच बावडा येथे असलेल्या शेतात प्रत्येक वर्षी दत्त जयंती ला मनोभावे पूजा करून अन्नदान देखील केले जाते.गेल्या दोन वर्षापूर्वी आपण सर्वजण कोरोना च्या पार्श्वभूमीवर संकटाला तोंड देत आहोत. या काळात अकलूज आणि परिसरात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाची अडचण येत आहे. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वामी समर्थ ग्रुप च्या वतीने 1000पेक्षाही अधिक रुग्णांना आणि नातेवाईकांना जेवणाचे डबे पूरविन्याचे देखील काम केले आहे.आपल्या व्यवसायाला सामाजिक कार्याची जोड देऊन आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केले आहे.त्यांचे वडील वसंतदास शहा यांचे सर्व स्तरातील लोकांबरोबर अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. माजी सहकार राज्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेबरोबर सुद्धा मैत्रीपूर्ण नाते आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कमलेश शहा यांनी देखील आपल्या मैत्री चा आदर्श निर्माण करीत त्यांनी अकलूज परिसरात अनेक जीवाला जीव देणारे मित्र जोडले आहेत.एखाद्या मित्राचा वाढदिवस असेल तर आवर्जून ते आपल्या मित्रांना सोबत घेऊन त्याचा वाढदिवस साजरा करतात. तसेच मोहिते पाटील परिवाराचे ते कट्टर समर्थक आहेत.आपल्या यशात आपला लहान भाऊ निलेश याचा मोठा वाटा असून, तो कुटूंबाची जबाबदारी सांभाळत असल्याने त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात अक्षरशः झोकून दिले आहे. प्रत्येक वर्षी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ते वेगवेगळे सामाजिक उपक्रम देखील राबवितात.आज 1मार्च त्यांचा वाढदिवस असून, स्वामी समर्थ ग्रुप अकलूज, आणि संघर्ष योद्धा न्यूज पोर्टल च्या वतीने लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.

Related Posts

विजयसिंह मोहिते-पाटील स्कूल अँड कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या बी.एस्सी. (नर्सिंग), जीएनएम व एएनएम  विभागातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या शपथग्रहण व दीपप्रज्वलन समारंभ (लॅम्प लाइटिंग सोहळा) संपन्न
Uncategorized

विजयसिंह मोहिते-पाटील स्कूल अँड कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या बी.एस्सी. (नर्सिंग), जीएनएम व एएनएम विभागातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या शपथग्रहण व दीपप्रज्वलन समारंभ (लॅम्प लाइटिंग सोहळा) संपन्न

June 15, 2023
हजारो रुग्णांना मृत्युच्या दाढेतून वाचवीणारे डॉ. एम. के. इनामदार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
संपादकीय

हजारो रुग्णांना मृत्युच्या दाढेतून वाचवीणारे डॉ. एम. के. इनामदार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

April 10, 2026
राज्यातील विनाअनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालयांच्या शंभर टक्के अनुदानासाठीच्या आंदोलनकडे तीन आठवडे उलटल्यानंतर ही राज्य शासनाचे दुर्लक्ष.*  शिक्षक घडविणाऱ्या शिक्षकांच्या वरील अन्यायामुळे शिक्षण क्षेत्रात संतप्त प्रतिक्रिया
शैक्षणिक

राज्यातील विनाअनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालयांच्या शंभर टक्के अनुदानासाठीच्या आंदोलनकडे तीन आठवडे उलटल्यानंतर ही राज्य शासनाचे दुर्लक्ष.* शिक्षक घडविणाऱ्या शिक्षकांच्या वरील अन्यायामुळे शिक्षण क्षेत्रात संतप्त प्रतिक्रिया

March 13, 2023
उद्योग शिलता आणि सामाजिक बांधिलकीचा नव आदर्श जोपासणारे पुरोगामी डॉ दाम्पत्य डॉ कुमार लोंढे व डॉ सौ पंचशीला कुमार लोंढे
संपादकीय

उद्योग शिलता आणि सामाजिक बांधिलकीचा नव आदर्श जोपासणारे पुरोगामी डॉ दाम्पत्य डॉ कुमार लोंढे व डॉ सौ पंचशीला कुमार लोंढे

February 12, 2023
Next Post
डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 4मार्च रोजी अकलूज येथे कव्वाली चे आयोजन

डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 4मार्च रोजी अकलूज येथे कव्वाली चे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!