डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 4मार्च रोजी अकलूज येथे कव्वाली चे आयोजन
अकलूज (प्रतिनिधी )डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. ०४ मार्च रोजी सायं.७ वा सुप्रसिद्ध कव्वाल सुलतान नाझा यांचा जंगी कव्वाली कार्यक्रम विजय चौक अकलूज येथे होणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटी, मुस्लिम जमात, माळशिरस तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी फिरोज देशमुख,जुल्कर शेख, मौलाना तय्यबअली, अफसर मोहोळकर,जावेद बागवान, मोहसीन बागवान,जावेद बागवान आयुब कुरेशी,हुसेन शेख, इब्राहिम मुलानी, जावेद तांबोळी , इम्रान मोहोळकर आदी उपस्थित होते .







