अकलुजमध्ये 2मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय येथे भव्य मानसिक आरोग्य शिबीराचे आयोजन
अकलुज (प्रतिनिधी )राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग व उपजिल्हा रुग्णालय, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मानसिक आरोग्य शिबीराचे आयोजन कण्यात आले आहे.उपजिल्हा रुग्णालय अकलुज येथे दि.2 मार्च 2023 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत सदर शिबीराचे आयोजित करण्यात आलेले आहे. यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडुन गरजुंची तपासणी, समुपदेशन व उपचार केले जाणार आहेत.उदासिनता, निराशा, बेचैनी, घबराहटअति काळजी, चिंता, झोपेच्या समस्याआत्महत्येचे विचार, व्यसन (दारू, तंबाखू)संशय, भास, भ्रम, आक्रमकता, चिडचिडपणाताणतणाव, नकारात्मक विचार * जुनाट डोकेदुखी, माइग्रेन, स्मृतिभ्रंश, फिटस्, मिरगीअसे त्रास असल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधुन शिबीराचा लाभ घेण्याचे अवाहन रुग्णालय प्रशासनाच्यावातीने करण्यात आले आहे.






