संग्रामनगर ग्रामपंचायत च्या सरपंचपदी अजित रेवंडे तर उपसरपंचपदी सौ. आशा सावंत यांची बिनविरोध निवड.
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील संग्रामनगर ग्रामपंचायत साठी सरपंच व उपसरपंच निवडीत सरपंच म्हणून अजित विठ्ठल रेवंडे व उपसरपंच म्हणून सौ.आशा राजसिंह सावंत यांची बिनविरोध निवड झाली. नूूतन सरपंच, उपसरपंच यांनी सत्काराला उत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते- पाटील सहकारी साखर कारखाना शंकरनगर चे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील,सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज या संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील,सोलापूर जिल्हा परिषद सदस्या कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनातून व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व कर्मचारी वर्ग, संग्रामनगर मधील सर्व नागरिक यांच्या सहकार्यातून जनतेची जास्तीत जास्त कामे करून, संग्रामनगर गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. यावेळी मंडळ अधिकारी चंद्रकांत भोसले, अकलूज चे तलाठी किसन हरी शिंदे,ग्रामपंचायत चे माजी सरपंच कमाल शेख, उप सरपंच यशवंत साळुंखे, ग्रामसेवक सुधाकर मुंगुसकर व इतर सदस्य उपस्थित होते.










