अकलूज (प्रतिनिधी )शिवरत्न शिक्षण संस्था संचलित विजयसिंह मोहिते-पाटील स्कूल अँड कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या बी.एस्सी. (नर्सिंग), जीएनएम व एएनएम विभागातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या शपथग्रहण व दीपप्रज्वलन समारंभ (लॅम्प लाइटिंग सोहळा) पार पडलानॅशनल फ्लोरेंस नाईटिंगल २०१२१ राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्रीमती मनीषा जाधव संस्थेच कार्यकारी अध्यक्ष मा.श्री.धैर्यशिल मोहिते-पाटील, मा.सौ.शितलदेवी मोहिते-पाटील या मान्यवरांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.परीस्थितीत कशी ही असूदेत सेवाभावी वृत्तीने आपण सर्व विद्यार्थ्यांनी नर्सिंग क्षेत्रात काम करायला हवे असे सांगत श्रीमती सौ.मनीषा जाधव यांनी नर्सिंग क्षेत्रासंबधी आपले अनुभव व विविध पैलूंवर विद्यार्थांना मार्गदर्शन केले.तसेच संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष मा.श्री.धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी विजयसिंह मोहिते-पाटील नर्सिंग महाविद्यालयातील बाहेर पडलेले ७८% विद्यार्थी सरकारी, खाजगी,परदेशात देखील सेवा देत आहे सांगत महाविद्यालय वविद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढाव सांगितला.या कार्यक्रमास डाॅ.संतोष खडतरे ,डाॅ.नितीन राणे,डॉ.सुरेश सुर्यवंशी,डाॅ.श्रीकांत देवडीकर, डाॅ.धनेश गांधी,डाॅ.निखिल मिसाळ संस्थेचे संचालक प्रा.डाॅ.विश्वनाथ आवड, रोटरी क्लबचे नितीन दोशी, व्यवस्थापन चेअरमन पराग गायकवाड, प्राचार्य मेरी सुमती, प्रा.शिवतीर्थ हिरेमठ, अश्रफ शेख व इतर मान्यवर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











