होमिओपॅथिक विकास आघाडीच्या विजयी उमेदवारांनी घेतली वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.गिरिषभाऊ महाजन यांची सदिच्छा भेट….
मुंबई..आज दि.06.04.2023 रोजी मुंबई येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, पंचवार्षिक निवडणूक 2023,AMHMCM प्रणित होमिओपॅथी विकास आघाडीने तेरा जागा जिंकत घवघवीत यश संपादन केले आहे. विजयी उमेदवारांनी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य तत्पर वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. नामदार गिरीशभाऊ महाजन यांची सेवासदन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी विजयी उमेदवारांचे व महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल डॉ. अरुण भस्मे यांचे मंत्री महोदयांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ना.गिरिशभाऊ महाजन यांच्या स्विय सहायक मा.यमुनाताई जाधव मॅडम यांची मंत्रालय, मुंबई येथे विजयी उमेदवारांनी भेट घेतली व होमिओपॅथीच्या प्रलंबित एमएमसी रजिस्ट्रेशन, सीएचओ व इतर मागण्या संदर्भात चर्चा केली. मा.जाधव मॅडम यांनी विजयी उमेदवारांची ओळख करून घेतली व शुभेच्छा दिल्या व येत्या नजीकच्या काळामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी लवकरच मुंबईमध्ये शासकीय बैठक आयोजित करू असे सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ.अरुण भस्मे, फेडरेशनचे सचिव पृथ्वीराज पाटील,डॉ.राजेंद्र खेडेकर, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ.एस.टी.गोसावी, सदस्य डॉ.बाळकृष्ण गायकवाड ,सदस्य डॉ. प्रतिक तांबे त्याचबरोबर विजयी उमेदवारांमध्ये क्लिनिकल बोर्ड मधून निवडून आलेल्या डॉ.कांचन देसरडा, डॉ. सूर्यकांत गीते , पॅराक्लीनिकल मधून निवडून आलेले डॉ.प्रताप भोसले, डॉ.सिताराम डोळे व प्रेक्लीनिकल मधून विजयी झालेले डॉ. शिवाजी बनसोडे व डॉ. वंदना शागा इ. विजयी उमेदवार उपस्थित होते. महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेच्या वतीने फोर्ट,मुंबई कार्यालयामध्ये प्रशासक डॉ.एस.टी.गोसावी, प्रशासकीय सदस्य डॉ. बाळकृष्ण गायकवाड व डॉ.प्रतीक तांबे आणि प्रबंधक वैद्य कैलास सोनवणकर यांनी सर्वांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.







