*शहीद वीर जवान हनूमंत निवृत्ती करडे यांचा आज २२ वा शहीद दिन साजरा करण्यात आला*
शहीद वीर जवान हनुमंत करडे यांचा उल्लेख आज आवर्जून करावासा वाटतो,कारण त्यांचा जन्मदिवस हनुमान जयंती व शहीद दिवस देखील हनुमान जयंती आहे.ते मूळचे राहणारे कळंब, वालचंदनगर येथील असून ते अकलूज या ठिकाणी राहतात.१२ जुलै १९८८ रोजी ते सैन्यात भरती झाले होते वयाच्या १८ वर्षी ते सैन्यात भरती झाले. सियाचीन बॉर्डर येथे सैन्य दलात हवालदार या पदावर कार्यरत होते १८/०४/२००० रोजी देशसेवा बजावत असताना ते सियाचीन बॉर्डरवर शहीद झाले…त्यांची १८ वर्ष देश सेवेसाठी गेली. आज त्यांच्या शहीद दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय वह्या वाटप करण्यात आल्या त्याच बरोबर वीरमाता श्रीमती कस्तुराबाई धोंडीराम मस्के या वीर शहीद जवान जयहिंद मस्के यांच्या मातोश्री यांचा सत्कार या वेळी करण्यात आला.तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सोलापूर येथील कार्यरत कुलकर्णी साहेब,मेजर राजेंद्र आढाव साहेब माजी सैनिक नातेपुते व इतर माजी सैनिक त्याच बरोबर डॉक्टर लक्ष्मण आसबे कामधेनू परिवाराचे सर्वेसर्वा हे देखील या शहीद वीरजवान हनुमंत करडे यांच्या शहीद दिनास उपस्थित होते.आजच्या शहीद दिना निमित्त युवा कीर्तनकार विठ्ठल महाराज कंदारे ज्ञानाई गुरुकुल अकलूज यांचे कीर्तन या ठिकाणी ठेवण्यात आले होते. उपस्थित देशभक्त व समाजसेवक यांचा सत्कार वीर पत्नी मोनिका हनुमंत करडे व चिरंजीव तुषार हनुमंत करडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यसनमुक्ती संघाचे मा.प्राध्यापक श्री धनंजय देशमुख सर यांनी केले. या शहीद दिनास हर्षवर्धन भूतनाळ, शिवाजी घोडके, समर कोतमिरे,गणेश जगताप, गणेश काळे,शंभू क्षीरसागर,आशुतोष शिंदे मित्र परीवार उपस्थित होते.



































