• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

मनिषा पांढरे यांचा सर फौंडेशनचा राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्काराने सन्मान

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
April 3, 2023
in आपला जिल्हा
0
मनिषा पांढरे यांचा सर फौंडेशनचा राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्काराने सन्मान
0
SHARES
69
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*मनिषा पांढरे यांचा सर फौंडेशनचा राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्काराने सन्मान*

सोलापूर स्टेट इनोवेशन अँड रिसर्च फाउंडेशन अर्थात सर फाउंडेशन व महाराष्ट्र वूमन टीचर्स फोरमच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत दहा कर्तूत्ववान महिलांना नारीशक्ती सन्मान पुरस्कार २०२२-२३देवून गौरवण्यात आले. यामधे मनिषा पांढरे -उपशिक्षक जि.प.आदर्श प्राथमिक शाळा माळेवाडी अकलूज यांना सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.दिलिप स्वामी साहेब यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्काराने सन्मानीत केले. त्या धर्मपुरीचे तंत्रस्नेही शिक्षक मुकेश कोळी यांच्या पत्नी आहेत. हा नयनरम्य ऐतिहासिक सोहळा वि.गु. शिवदारे काॕलेज आॕफ आर्टस्, कॉमर्स अँड सायंन्स जुळे सोलापूर येथे पार पडला. या दिमाखदार सोहळ्यासाठी महानगरपालिका आयुक्त मा.शीतल उगले मॕडम,वैद्यकीय अधिकारी डाॕ.अग्रजा चिटणीस मॕडम, दै.सकाळचे निवासी संपादक श्री. अभय दिवाणजी व स्वामी समर्थ सूतगिरणीचे चेअरमन श्री .राजशेखर शिवदारे, सर फौंडेशनचे राज्य समन्वयक सिध्दाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे-वाघ जिल्हा समन्वयक राजकिरण चव्हाण व अनघा जहागीरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. शिक्षण पटलावरती आपल्या कुशल कार्याने आणि विविध उपक्रमाने मनिषा पांढरे यांनी आपल्या कार्याचा नावलौकिक केला होता. वेळापत्रकाबाहेर जावून वेगवेगळे विद्यार्थी पुरक उपक्रम राबवून आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षणाला ज्ञानरचनावादाची जोड देवून त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य हे शिक्षकांसाठी प्रेरणादायी असेच आहे.माढा व माळशिरस तालूक्यात त्यांनी आपल्या वैविध्यपूर्ण अध्यापनाने अनेक गूणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असाच आहे. मराठवाड्यातील वसमत जि.हिंगोली हे त्यांचे गाव असून आई -वडिल सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असून विठ्ठलाचे भक्ति उपासक असल्याने मनिषा पांढरे यांना आध्यात्मिक व शैक्षणिक वारसा हा घरूनच लाभला. सेवाभावी वृत्ती, सकारात्मक विचारशैली आणि सरळ साधे राहणीमान आणि अफाट पुस्तक प्रेम यातून त्यांनी स्वतःला समृद्ध बनवले आहे. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवताना टॕबलेट शाळेसाठी स्वतःच्या खिशातून चाळीस ते पन्नास हजार रूपये स्वतः खर्च करून रोटरीच्या माध्यमातून या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली. कोरोना काळात माळशिरस पंचायत समीतीचे कार्यकुशल गटशिक्षणाधिकारी मा.धनंजय देशमुख ,विस्ताराधिकारी मा. सायरा मुलाणी, केंद्रप्रमुख विठ्ठल नष्टे यांच्या शाळा बंद शिक्षण आहे या प्रभावी उपक्रमात आॕनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून माळशिररस शिक्षण विभागाला अग्रभागी ठेवण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान मैलाचा दगडच. माजी केंद्रप्रमुख सुधीर नाचणे सर यांच्या मार्गदर्शना खाली या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थी जिल्ह्याभरातून जोडणी करून शिक्षणाची गंगा गोरगरीब वंचितांच्या दारी पोहचवली. उसतोड कामगार आणि शिक्षणापासून शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी राज्यात बालरक्षक म्हणून फेसबूकच्या माध्यमातून व प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात वाडीवस्तीवर जावून अने विद्यार्थी शिक्षणाशी जोडून चौकटीबाहेरचे कार्य हे संपूर्ण महाराष्ट्राच्या शिक्षण चळवळीतील प्रेरणादायी असेच आहे.जि.प.शाळा बेंबळे ता.माढा या स्वग्रामी सेवावृत्तीने अनेक गरजू विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करून शिक्षणासी जोडून त्यांच्यासाठी अमृतरूपी शिक्षणाने त्यांचे आयुष्य बदलून टाकले. गोड फळे असणाऱ्या झाडालाच दगड मारले जातात अशा प्रचलीत म्हणीप्रमाणे कुटूंबिक अन्याय सहन करून आपल्या शैक्षणिक व कौटुंबिक जबाबदारीला योग्य न्याय देणारी सावित्री म्हणजे मनिषा पांढरे. आजच्या पाखंडी समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून कामच कामाचा गुरू असतो हेच दाखवून दिले. आपल्या दोन मुलींचा व वयस्कर सासूबाई यांचा सांभाळ करून कौटुंबिक जबाबदारी व शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देवून शैक्षणिक जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडताना शिस्तीचा आदर्श उभा केला. आदर्श पत्नी ,आई व सून म्हणून आणि तळमळीचा शिक्षक म्हणून त्यांचे कार्य हे शिक्षण विभागासाठी व समाजासाठी प्रेरक ठरेल. सत्य हाच ईश्वर आणि आपले कर्म हीच पूजा माणून आपल्या कामावर नीष्ठा ठेवणा-या मनिषा पांढरे म्हणजे नारीशक्तीचा कणाच वाटतात. आजवर अनेक पुरस्काराने सन्मानीत असणाऱ्या मनिषा पांढरे यांच्या या कार्याची दखल घेवून सर फाउंडेशन व वुमन्स फोरमने त्यांना राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार देवून बळच दिले आहे. यावेळी त्यांचे समवेत त्यांच्या शाळेतील सहशिक्षक विजय अस्वरे व शिक्षक संघाचे नेते अशोक पवार हे कुटूंबासह तसेच महाराष्ट्रातून आलेले सर फौंडेशनचे पदाधिकारी बहूसंख्येने उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक शिवलिंग नकाते व सर्व शिक्षक स्टाफ तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांचे आनमोल सहकार्य पांढरे मॕडम यांना याकामी लाभले.

*फिरून पाहू नकोस माघारी**तुझ्यात आहे शक्ती भारी!!**तुच आहेस सबला नारी,**रोशन कर दुनिया सारी!!**जन्मा येण्याचं कारण तू,**नात्यामधली गुंफण तू!!**आजच्या युगाची प्रगती तू,**लढणारी खरी सावित्री तू!!*या कवितेच्या ओळी सार्थ ठरवणा-यात्यांच्या या खडतर संघर्षाला मनापासून सलाम.

शब्दांकन-ह.भ.प.तुकाराम वाघमोडे चाकोरे

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
दिपक कोळेकर यांचे निधन

दिपक कोळेकर यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In