दिपक कोळेकर यांचे निधन.
अकलूज (प्रतिनिधी )संग्रामनगर (गुमास्ता कॉलनी )अकलूज येथील रहिवाशी दिपक हरिभाऊ कोळेकर (वय 42वर्षे )यांचे अल्पशा आजाराने खाजगी दवाखान्यात उपचार सुरु असताना 3एप्रिल रोजी पहाटे 2-30वाजता निधन झाले. त्यांचे पश्चात आई -वडील, पत्नी,मुलगी, भाऊ, भावजय, दोन पुतणे असा परिवार आहे.त्यांचेवर अकलूज येथील अकलाई स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या तिसऱ्याचा (सावडण्याचा )विधी 5एप्रिल रोजी सकाळी होणार आहे.ते अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.






