भारतीय जनता युवा मोर्चा चे वतीने शिखर शिंगणापुर याञे निमित्त मोफत पाणी बाॅटल वाटप,
अकलूज (प्रतिनिधी ) शिखर शिंगणापुर याञे निमित्त माळशिरस तालुक्यातील अनेक गावातुन शंभु महादेवाच्या भेटि साठि कावडी निघत असतात.या कावडि बरोबर अनेक भाविक भक्त असतात.आणि हे भक्त चालत कावड आपल्या खांद्यावर घेऊन जात असतात.आणि या वेळी डोंगरातुन कावड घेऊन जात असताना ऐन उन्हाळ्यात तहानेने व्याकुळ झालेल्या कावडितील भक्तांची तहान भागावी या साठि भारतीय जनता युवा मोर्चा चे वतीने मोफत पाणी बाॅटल वाटप करण्यात आले. या वेळी कावडीतील भक्तांना व देवदर्शनासाठि निघेलेल्या भाविकांना मोफत पाणी वाटप करण्यात आले या वेळी भाविकांनी पाणी बाॅटल घेऊन तहान भागवीली व आयोजकांचे आभार माणुन कावडि पुढे मार्गस्थ झाल्या या वेळी उपस्थित भारतीय जनता युवा मोर्चा चे उपाध्यक्ष ॲड.रणजीत भोसले. श्रीकांत दोरकर सुरेश दोरकर राहुल भोसले वैभव दोरकर अंबादास दोरकर व ईतर कार्यकर्त उपस्थित होते.












