रत्नाई कृषी महाविद्यालय आनंदनगर, अकलूज मधील आठ विद्यार्थ्यांची विविध बँकेमध्ये कृषी अधिकारी(AFO) म्हणून निवड
अकलूज (प्रतिनिधी )बँकिंग कर्मचारी निवड संस्था (IBPS)परीक्षेतून राष्ट्रीयकृत बँकेतील सर्व श्रेणीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. यावर्षी रत्नाई कृषी महाविद्यालय आनंदनगर, अकलूज मधील विद्यार्थ्यांची विविध बँकेमध्ये कृषी अधिकारी(AFO) म्हणून निवड झालेली आहे. यात सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये योगेश दराडे,संजय वाघमारे, अमृता चव्हाण,सायली गोडे; युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये तेजस जाधव,हर्षदा गुजर;पंजाब नॅशनल बँकेत ओंकार गावडे (ऑल इंडिया 3 रँक) तर बँक ऑफ महाराष्ट्र प्रोबेशनरी ऑफिसर(PO)साठी विकास गांगुर्डे यांची निवड झाली. सर्व अधिकारी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे व सर्व प्राध्यापक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.







