महाराष्ट्र फौंडेशन च्या वतीने अकलूज येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. नितीन एकतपुरे व डॉ. सौ. विद्याताई एकतपुरे यांना सन 2023 चा राज्यस्तरीय धन्वंतरी पुरस्कार जाहीर -रणजित लोहार (सर)
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथील महाराष्ट्र फौंडेशन या सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने अकलूज येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. नितीन एकतपुरे व डॉ. सौ. विद्याताई एकतपुरे यांना सन 2023 चा राज्यस्तरीय धन्वंतरी पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष रणजित लोहार (सर) यांनी दिली.ते पुढे बोलताना म्हणाले की,महाराष्ट्र फौंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, सास्कृतिक, कला, क्रीडा, कृषि वैद्यकीय, देशसेवा क्षेत्रात गेली आठ वर्षापासून कार्यरत आहे. “महाराष्ट्र फाँडेशन” सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त “महाराष्ट्र फौंडेशन ” राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रात कार्य करणा-या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येत आहे.अकलूज येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. नितीन एकतपुरे व डॉ. सौ. विद्याताई एकतपुरे यांना “महाराष्ट्र फाँडेशन” राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळ्यात राज्यस्तरीय धन्वंतरी पुरस्कार सन 2023 चा देवून सन्मानित करण्यात येणार आहे.हा सोहळा मंगळवार दिनांक 04/04/2023, दुपारी 3.00 वा. लोकमान्य टिळक सभागृह, हिराचंद नेमचंद वाचनालया शेजारी,सोलापूर येथे होणार आहे.







