शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष संग्रामसिंह (अण्णासाहेब )जयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते सुवर्णपदक विजेता ऋषिकेश भाकरे याचा सन्मान.
अकलूज (प्रतिनिधी )शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष संग्रामसिंह (अण्णासाहेब )जयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रत्नाई कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी ऋषिकेश भाकरे याचा सन्मान करण्यात आला.रत्नाई कृषि महाविद्यालय अकलूजचा चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी ऋषिकेश भागवत भाकरे हा ऑल इंडिया युनिव्हर्सिटी किकबॉक्सिंग चॅम्पयनशिपमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून खेळताना – ७५ किलो वजन गटात 6 फाईट्स खेळून सुवर्ण पदक पटकावले .या स्पर्धा वीर बहादुर सिंह पूर्वांचल युनिव्हर्सिटी जौनपुर उत्तर प्रदेश येथे 13-17 March या कालावधीत पार पडल्या या स्पर्धेसाठी ६५ विद्यापीठातील ६०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ चे सचिव अभिजित रणवरे राजाभाऊ लव्हाळे,विनोद दोशी,हर्षवर्धन खराडे,तात्या एकतपुरे,नारायण फुले,सुभाष दळवी,वसंत जाधव,रामभाऊ गायकवाड,उत्कर्ष शेटे,प्रा.रवी नलवडे,प्रा.निंबाळकर आदी उपस्थित होते.








