: संग्रामनगर येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी. अकलूज (प्रतिनिधी) संग्रामनगर येथील श्री साईबाबा सेवा ट्रस्ट यांच्यावतीने श्री साई प्राणप्रतिष्ठा २६ वा वर्धापन दिन व श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. संग्रामनगर, अकलूज येथील श्री साई मंदिरात परंपरेनुसार श्रीराम नवमी उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. मंदिरामध्ये पहाटेचा अभिषेक व महापूजे नंतर सकाळी ८ वाजता आप्पासौ पवार व सोनाली पवार या उभयंतांच्या हस्ते परिसरात यज्ञ प्रज्वलन करण्यात आले. सकाळी १० वाजता शिवशंभू भजनी मंडळाचे सामुदायिक भजन पार पडले. दुपारी १२ वाजता साई मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला.या वेळी महाआरती ट्रस्टचे संचालक चंद्रकांत कुंभार व सौ शामा कुंभार या उभयंत्यांच्या हस्ते संपन्न झाली.: क्रांतिसिंह माने पाटील, श्रीराज माने पाटील यांनीही श्री साईंचे दर्शन घेतले.ट्रस्टचे अध्यक्ष किशोरसिंह माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सिंह मोहिते पाटील यांनी या निमित्ताने श्री साईबाबा चे दर्शन घेतले सोहळ्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी ७ वाजता शिवामृत दूध संघाचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील व सौ शितलदेवी मोहिते पाटील या उभयंतांच्या हस्ते आरती संपन्न झाली. यावेळी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील अकलूज गावचे माजी सरपंच शिवतेसिंह मोहिते पाटील उपस्थितीत होते दुपारी माळीनगर येथील ब्रह्मचैतन्य महिला भजनी मंडळाने भजनाची सेवा बजावली. तर सायंकाळी ह. भ. प. जगन्नाथ खरात यांचे एकनाथी सोंगी भारुड सादर झाले. दिवसभरात श्री साईबाबा सेवा ट्रस्ट व डॉ. निखिल आर्वे यांच्या वतीने आर्वे हॉस्पिटल या ठिकाणी मोफत बीपी, शुगर व थायरॉईड यांची तपासणी करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष किशोरसिंह माने पाटील, हनुमंतराव खडके, राजेंद्र आर्वे, देवीचंद ओसवाल, जयंत कुलकर्णी, अजित राखले, उमेश शेटे, सुभाष काळे, दीपक शिंदे ,अशोक गुजर ,अरुण राऊत, अजित माने आदेश शहा, गंगाधर देवकाते आदींनी परिश्रम घेतले. दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.


















