महिलांनी कर्तुत्व सिद्ध करताना कुटुंबाच्या आशीर्वादाने गरुड भरारी घ्यावी : प्रा. गु ल ना स मुजावर यांचे प्रतिपादन
कोडोली, ता. 8
: ” महिलांना कर्तुत्व सिद्ध करताना अनेकदा कुटुंबातून च विरोध होत असतो. अशा कठीण प्रसंगी महिलांनी कुटुंबीयांना विरोध न करता आपल्या विचाराशी ठाम राहावे., किंबहुना त्यांच्या आशीर्वादानेच कर्तृत्वाची गरुड भरारी घ्यावी”, असे प्रतिपादन प्रा. गु ल ना स मुजावर यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्स वा चे अवचि त्य साधून (कोडोली ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित गुणवंतांच्या गौरव समारंभात प्रमुख वक्त्यां म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील होते. या महाविद्यालयातील विद्यार्थी – शिक्षक शिवराज पाटील यांची डी. आर. डी. ओ. या केंद्रशास ना च्या वि ज्ञान संस्थेत कनिष्ठ शास्त्र ज्ञ पदी नियुक्ती झाल्याबद्दल , स्नेहल चौगुले, शिल्पा पवार, मयुरी जाधव या विद्यार्थिनी – शिक्षिका केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल तसेच विद्या सुर्वे या विद्यार्थिनी – शिक्षिकेला आय. आर. बि. इन्स्टिटय़ूट ने ‘ शिक्षक रत्न’ पुरस्कार दिल्याबद्दल तसेच महाविद्यालयाने महिला दिनानिमित्त घेतलेल्या हस्ताक्षर स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या अनुक्रमे अनुष्का खं बा ळे , अश्विनी काळे, प्राजक्ता पाटील आणि माधुरी कुंभार यांना महाविद्यालयाने प्रमाणपत्र व कर्तुत्ववान महिला विषयक ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले. क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूज ना ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी डॉ. जयंत पाटील यांनी सर्व महिला शिक्षिका व विद्यार्थिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील म्हणाले, ” आजही काही कुटुंबांमध्ये मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये भेद केला जातो. उच्च शिक्षण देताना नकळत मुलाला झुकते माप दिले जाते. हे थांबले पाहिजे.” यावेळी सर्व सत्कार मूर्तीनी मनोगत व्यक्त केले. प्रा. डी. डी. पाटील आणि प्रा. संजय जाधव यांचीही महिलांच्या विष यी भाषणे झाली. मोनाली गा य क वा ड यांनी प्रास्ताविक केले. माधुरी कुंभार यांनी आभार मानले. सौ. सुनीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले.







