डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव मध्ये इंटरनॅशनल फालमफोक या चित्रपटाला एकूण 8 विभागात नामांकने जाहीर
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथील धीयो फिल्मस निर्मित व ला. रा. साळुंखे यांची कथा, पटकथा, प्रा. धीरज गुरव दिग्दर्शीत व योगेश खिलारे यांची प्रमुख भूमिका असलेल्या इंटरनॅशनल फालमफोक या मराठी चित्रपटाला प्रदर्शना पूर्वीच मोठी प्रसिद्धी मिळत आहे.यापूर्वी मुंबई येथे सांस्कृतिक कलादर्पण आयोजित चित्रपट महोत्सवात देखील हा चित्रपट दाखविण्यात आला होता. यावेळी उपस्थित असलेल्या चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर यांनी चित्रपट आणि कलाकारांचे कौतुक केले होते.त्यानंतर आता मराठी सिनेसृष्टीतील नामांकित आणि भव्य दिव्य अशा डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि 8वा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव 2023 मध्ये इंटरनॅशनल फालमफोक या चित्रपटाला एकूण 8 विभागात नामांकने मिळाली आहेत.उत्कृष्ट समाजिक चित्रपट-इंटरनॅशनल फालमफोक,उत्कृष्ट कथा-ला. रा. साळुंखे,उत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक-प्रा. धीरज दिलीप गुरव,उत्कृष्ट पदार्पण अभिनेता-योगेश खिलारे,उत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री-नेहा मुळीक,उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता-सुरेश विश्वकर्मा,उत्कृष्ट बालकलाकार-अहद काझी,उत्कृष्ट विनोदी अभिनेता-दीपक जाधव अशी नामांकने जाहीर झाली आहेत.त्यामुळे प्रदर्शना पूर्वीच या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे.







