*शंकरराव मोहिते महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाची अभ्यास सहलचे आयोजन.*
अकलूज दि.६ (संजय लोहकरे यांजकडून)
अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग बीएससी भाग ३ च्या वर्गाची अभ्यास सहल उजनी जलाशयवरील अभयारण्य पक्षी निरीक्षण,मत्स्य बीज केंद्र आणि उजनी धरण इत्यादी ठिकाणी जाऊन पक्षांचे निरीक्षण मत्स्यपालन व मत्स्य पालनासाठी लागणारे क्राफ्ट अँड गिअर्स इत्यादी प्रात्यक्षिक अभ्यास क्रमातील बाबींचे निरीक्षण केले. या अभ्यास सहलीमध्ये पक्षी अभयारण्याचे प्रचंड कुतूहल विद्यार्थ्यांमध्ये जाणवत होते.या परिसरात विदेशी स्थलांतरीत विविध पक्षांचे आगमन झालेले आहे.त्यामध्ये फ्लेमिंगो,वेगवेगळ्या जातीचे बगळे,पान कोंबडी असे अनेक पक्षी आढळून आले.हे पक्षी अन्न व प्रजननासाठी स्थलांतरीत झालेले असतात.हे निरीक्षणातून दिसून आले.यावेळी मासेमारी हा सोपा व फायदेशीर व्यवसाय आहे याची ही महिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.या व्यवसायासाठी बोट,मासेमारीसाठी लागणारे जाळे,हुक्स,सिंकरर्स म्हणजेच क्राफ्ट आणी गियरर्सची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्षिकातून देण्यात आली.त्यानंतर मत्सबीज केंद्र येथे अभ्यास भेटीतून विद्यार्थ्यांना मत्स्य संवर्धन व मत्स्य व्यवसायबद्दल सखोल माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.यापुढे प्राणीशास्त्राच्या अभ्यासाकांना प्राणीशास्त्र विषयातील महत्त्व व गरज दिसून येते सदर सहलीमध्ये बीएससी भाग ३ वर्गातील 13 विद्यार्थी व विद्यार्थिनी व सोबत सहल प्रमुख प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ सुधा बनसोडे होते.



















